September 13, 2024 8:40 AM

देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रात लक्षणीय परिवर्तन – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रात लक्षणीय परिवर्तन होत असून त्यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत नागरी विमान वाहतूक या विषयावर दुसऱ्या आशिया-प्रशांत मंत्रिपरिषदेत मार्गदर्शन करताना बोलत होते. या परिषदेत दिल्ली ठराव जाहीर करण्यात आला. त्याचा सर्व सदस्य देशांनी स्वीकार केला.   नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं. ते या परिषदेचे अध्यक्ष आहेत. २०३५ पर्यंत साडेतीन अब्ज वार्षिक प्रवाशांसाठी...

September 12, 2024 7:06 PM

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी भारतीय पथकासोबत प्रधानमंत्र्यांचा संवाद

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय पथकासोबत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. या प्रतिष्ठित स्पर्धेतल्या यशाबद्दल त्यांनी पदकविजेत्यांचं आणि सहभागी खेळाडूंचं अभिनंदन केलं. भारतानं ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कांस्य अशी २९ पदकं मिळवून विक्रमी कामगिरी केली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय तसंच भारतीय    पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष देवेंद्र झाझरिया हेही यावेळी उपस्थित होते.

September 12, 2024 11:47 AM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नागरी विमान वाहतुकीवरील दुसऱ्या आशिया-प्रशांत मंत्रीस्तरीय परिषदेला करणार संबोधित

नागरी उड्डाणाशी संबधित आयोजित दुसऱ्या आशिया प्रशांत मंत्रिस्तरीय परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, आज सहभागी होत आहेत. नागरी उड्डयन मंत्री राममोहन नायडू यांच्या हस्ते काल या संमेलनाचं उद्घाटन झालं. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या या संमेलनात प्रधानमंत्री संबोधित करतील. दरम्यान, राममोहन नायडू यांनी २०३५ पर्यंत प्रतिवर्ष ३ अब्ज प्रवाशांना विमान प्रवासात सामावून घेण्यासाठी आशिया प्रशांत उड्डयन क्षेत्राच्या प्रारुप आराखड्यात धोरणात्मक गुंतवणुकीचं आवाहन केलं आहे. २०२५ पर्यंत या क्षेत्रात महिलांचा समाव...

September 10, 2024 6:43 PM

जागतिक समस्यांवर स्थानिक उपाय शोधण्याची गरज – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

जागतिक समस्यांवर स्थानिक उपाय शोधण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज, नवी दिल्ली इथं स्थापन केलेल्या अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या, पहिल्या व्यवस्थापकीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं, त्यावेळी ते बोलत होते.  संशोधन परिसंस्थेच्या मार्गातले अडथळे ओळखून ते दूर करण्यासाठी योग्य पावलं उचलायला हवीत, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. संशोधनामध्ये सध्याच्या आव्हानांवर  नवीन उपाय शोधण्यावर भर द्यायला हवा असं ते म्हणाले.    संस्थांचं श्रेणीकरण आणि मानकीकरणावर भर दे...

September 9, 2024 2:30 PM

प्रधानमंत्री येत्या २९ सप्टेंबरला मन की बात कार्यक्रमाद्वारे श्रोत्यांशी साधणार संवाद 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २९ सप्टेंबरला आकाशवाणीवरुन मन की बात कार्यक्रमाद्वारे  देश-विदेशातल्या श्रोत्यांशी संवाद  साधणार  आहेत. या कार्यक्रमाचा हा ११४ वा भाग असेल.  या कार्यक्रमासाठी  आपल्या  कल्पना आणि सूचना  १८००-११-७८०० या टोल फ्री क्रमांकावर २७ सप्टेंबरपर्यंत  देता येतील. तसंच माय  जीओव्ही  संकेतस्थळावरून देखील सूचना  पाठवता  येतील.  हा कार्यक्रम २९ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरुन  प्रसारित  करण्यात  येईल.

September 8, 2024 8:58 PM

२९ सप्टेंबरला आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमातून प्रधानमंत्र्यांचं संबोधन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २९ सप्टेंबरला आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमातून देशवासियांसोबत संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ११४ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी येत्या २७ तारखेपर्यंत आपल्या सूचना पाठवता येतील.  या सूचना १८०० - ११ - ७८०० हा टोल फ्री क्रमांक, १९२२ या क्रमांकवर मिस्ड कॉल देऊन येणारा दुवा, तसंच नरेंद्र मोदी ॲप किंवा माय जी ओ व्ही या सेवेचा वापर करून पाठवता येणार आहेत.  हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, संकेतस्थळं, आणि मोबाईल ॲपवर प्रसारित होईल...

September 6, 2024 1:29 PM

जलसंचयाचा थेट संबंध आर्थिक प्रगतीशी असून, पाण्याचं योग्य व्यवस्थापन गरजेचं – प्रधानमंत्री

जलसंचयाचा थेट संबंध आर्थिक प्रगतीशी असून, पाण्याचं योग्य व्यवस्थापन गरजेचं असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी केलं आहे. गुजरातमधे  सूरत इथे,  'जल संचय जन भागीदारी' या अभियानाचा प्रारंभ दूरस्थ पद्धतीने  केल्यानंतर ते बोलत होते. भारतात पाण्याला ईश्वराचं रूप मानलं असून पाण्याच्या साठवणीच्या अनेक शास्त्रशुद्ध पद्धती भारतात परंपरेने विकसित झाल्या आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पाण्याची टंचाई या समस्यांवर जलसंचयानेच तोडगा निघू शकतो असं ते म्हणाले. सध्या सुरू असलेल्या 'जल श...

September 6, 2024 10:14 AM

गुजरातमध्ये सूरत इथे ‘जलसंचय जन भागीदारी’ अभियानाचा प्रधानमंत्र्याच्या हस्ते आज शुभारंभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सूरत इथे, दूरस्थ माध्यमातून, 'जल संचय जन भागीदारी' या अभियानाचा प्रारंभ होणार आहे. सध्या सुरू असलेल्या 'जल शक्ति अभियानाशी' हे अभियान संलग्न असणार आहे. या अभियानाद्वारे गुजरात राज्यातील जनता, स्थानिक स्वराज्य संस्था,उद्योगसंस्थाना पावसाच्या पाण्याचं पुनर्भरण अर्थात 'रेन हार्वेस्टींग' करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा उभारण्यासाठी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अभियानाअंतर्गत, गुजरातमध्ये सामुदायिक भागीदारीतून सुमारे २४ हजार ८०० बांधकामं केली ज...

September 5, 2024 1:42 PM

आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाला आजपासून सुरुवात

गेल्या दहा वर्षांत भारताची सौर उर्जा क्षमता ३२ पटींनी वाढली असून हा वेग कायम राहिला तर २०३०पर्यंत देश ५०० गिगा वॅट इतकी सौर उर्जा निर्मिती करेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. नवी दिल्ली इथे आयोजित दोन दिवसांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाला प्रधानमंत्री मोदी यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे संबोधित केलं. भारताने गेल्या काही वर्षांत हरित ऊर्जा निर्मितीत मोठी प्रगती केली आहे. भारतासह जगभरातही अनेक संस्कृतींनी सूर्याचं महत्त्व सांगितलं आहे. या महोत्सवाद्वारे सूर्याचा उत...

September 5, 2024 1:22 PM

भारतीय अर्थव्यवस्थेत सुमारे १६० अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणुकीसह सिंगापूर हा भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारतीय अर्थव्यवस्थेत सुमारे १६० अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणुकीसह सिंगापूर हा भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ब्रुनेईचा यशस्वी दौरा आटोपल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल सिंगापूर इथं पोहोचले. त्यानंतर मोदी आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वोंग यांच्यात आज शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर भारत आणि सिंगापूर दरम्यान आरोग्य आणि औषध, शिक्षण आणि कौशल्य विकास, डिजिटल तंत्रज्ञान आणि भारत-सिंगापूर सेमीकंडक्टर परिसंस्था भागीदारी या क्षेत्रातील सहका...