September 17, 2024 10:01 AM

पुणे हुबळी, कोल्हापूर पुणे, नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसचं पंतप्रधानांच्या हस्ते दूरस्थ माध्यमातून लोकार्पण

राज्यातल्या तीन वंदे भारत एक्सप्रेसचा प्रारंभ काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत करण्यात आला. पुणे हुबळी, कोल्हापूर पुणे आणि नागपूर सिकंदराबाद मार्गांवर या गाड्या धावतील. पुणे हुबळी वंदे भारत रेल्वेला नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पुण्यातल्या रेल्वे स्थानकावरुन रवाना करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या गाडीमुळे राज्यातल्या प्रवाशांचा प्रवास सुख...

September 16, 2024 6:53 PM

अहमदाबाद ते गांधीनगर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला प्रधानमंत्र्यांचा हिरवा झेंडा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद ते गांधीनगर या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवला. तसंच अहमदाबाद ते भुज या वंदे भारत मेट्रोसह ८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी केली. अहमदाबाद ते भुज ही देशातली पहिली वंदे भारत मेट्रो आहे. सध्याचा काळ हा भारतासाठी सुवर्णकाळ असून पुढच्या २५ वर्षांत भारताचा समावेश विकसित देशांमध्ये होईल, असा विश्वास मोदी यांनी यावेळी झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केला.

September 16, 2024 3:24 PM

हरित ऊर्जेच्या क्षेत्रात जगाचं नेतृत्व करण्यासाठी भारत सज्ज – प्रधानमंत्री

हरित ऊर्जेच्या क्षेत्रात जगाचं नेतृत्व करण्यासाठी भारत सज्ज असून याचाच भाग म्हणून सरकारनं २० हजार कोटी रुपयांच्या ग्रीन हायड्रोजन मिशनला सुरुवात केली आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज गुजरातमधे गांधीनगर इथं आयोजित चौथ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातल्या गुंतवणूकदारांच्या परिषदेत बोलत होते. केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने या परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेला संबोधित करताना प्रधानमंत्र्यांनी भारताने ऊर्जा क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला.   भारतान...

September 16, 2024 9:35 AM

विस्तारीत रेल्वे जाळ्यामुळे पूर्व भारतातल्या आर्थिक विकासाला प्रोत्साहन मिळेल- प्रधानमंत्री

पूर्व भारतातल्या विस्तारित रेल्वे जाळ्यामुळं संपूर्ण प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. झारखंड राज्याची राजधानी रांची इथं ते काल बोलत होते. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून काल साडेसहाशे कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांचं भूमीपूजन तसंच लोकार्पण करण्यात आलं. याचवेळी प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ माध्यमातून सहा नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.   प्रधानमंत्री जमशेदपूरमधल्या टाटानगर ...

September 15, 2024 8:03 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दाखवला ६ वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा

सबका साथ सबका विश्वास या मंत्रानं देशात विचारधारा आणि प्राधान्यक्रमात आमूलाग्र बदल केला असून गरीब, आदिवासी, दलित, वंचित, मागासवर्गीय, महिला, युवावर्ग आणि शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जात आहे, असं प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आपल्या झारखंड दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज ६ वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्य्रक्रमात प्रधानमंत्र्यांनी ६६० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पणही केलं...

September 14, 2024 8:19 PM

शेतकऱ्यांचं हित साधण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

शेतकऱ्यांचं हित साधण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी घेतलेले निर्णय अधोरेखित करत अशा निर्णयांमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल तसंच ग्रामीण भागात अधिक रोजगार निर्माण होतील, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये व्यक्त केला आहे. देशाच्या अन्न सुरक्षेमध्ये शेतकऱ्यांची मोलाची भूमिका आहे, असं त्यांनी नमूद केलं आहे. कांद्यावरच्या  निर्यात शुल्कात कपात करण्याच्या तसंच खाद्यतेलावरचं आयातशुल्क वाढवण्याच्...

September 14, 2024 2:02 PM

जम्मू-काश्मीर मध्ये युवा वर्गाच्या राजकारणातल्या सहभागामुळे विकासाचं नवं युगं अवतरल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

गेल्या काही वर्षांत जम्मू- काश्मीर मध्ये युवकांच्या राजकारणातल्या सहभागामुळे विकासाचं नवं युगं अवतरल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज जम्मू- काश्मीरमध्ये डोडा इथं प्रचारसभेला संबोधित केलं.  स्वातंत्र्यानंतर जम्मू- काश्मीर हा प्रदेशावर जगाचं लक्ष असल्याचं ते म्हणाले. यापूर्वी ज्या पक्षांवर जम्मू- काश्मीरच्या नागरिकांनी विश्वास ठेवला, त्या पक्षांनी फक्त परिवारवादाला महत्व दिल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे जम्मू- काश्मीरमधला युवा वर्ग हा आतंकवादामुळे पिचला असल्याचं त्य...

September 14, 2024 1:13 PM

प्रधानमंत्री उद्यापासून झारखंड, गुजरात आणि ओदिशाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून झारखंड, गुजरात आणि ओदिशाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मोदी उद्या झारखंडमध्ये सहा वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर ते ६६० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी करतील.   तसंच टाटानगर इथं प्रधानमंत्री आवाज योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचं वाटप करतील आणि जमशेदपूर इथल्या लाभार्थ्यांना पहिल्या हफ्त्याचं हस्तांतरण करणार आहेत.

September 13, 2024 8:38 PM

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची उद्या डोडा इथं सभा

जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सभा घेणार आहेत. जम्मू कश्मीरच्या डोडा जिल्ह्यात भाजपच्या रॅलीला ते संबोधित करतील. या भागातल्या तीन जिल्ह्यांत १८ सप्टेंबर रोजी मतदान होईल. प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या भागात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त आहे. या नंतर १९ सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री श्रीनगरला भेट देतील.    दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रकाशित केला आ...

September 13, 2024 12:15 PM

पॅरालिंपिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंशी प्रधानमंत्र्यांनी साधला संवाद

पॅरिस इथं नुकत्याच झालेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या पदकविजेत्या आणि इतर स्पर्धकांचं त्यांनी अभिनंदन केलं. या दिव्यांग खेळाडूंचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वांसाठीच एक मोठी शक्ती असल्याचं ते म्हणाले.  या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या सुमित अंतिल यानं आपलं एक सुवर्ण पदक प्रधानमंत्र्यांना समर्पित केलं. तर प्रधानमंत्र्यांनी या स्पर्धेपूर्वी दिलेलं प्रोत्साहन आपण कधीच विसरू श...