July 21, 2024 11:30 AM

जागतिक वारसा समितीचं ४६वं अधिवेशनाचं आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जागतिक वारसा समितीचं ४६ वं अधिवेशन आजपासून नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं सुरू होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सायंकाळी ७ वाजता याचं उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात युनेस्कोच्या महासंचालक ऑड्रे अझोले आणि युनेस्को जागतिक वारसा सचिवालयातले वरिष्ठ अधिकारी तसंच विविध देशातले सांस्कृतिक मंत्री, राजदूत आणि तज्ञ उपस्थित राहणार आहेत. भारत पहिल्यांदाच जागतिक वारसा समितीच्या अधिवेशनाचं यजमानपद भूषवणार आहे. हे अधिवेशन वर्षातून एकदा होतं.

July 18, 2024 8:25 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधकांकडून वापरले जाणारे शब्द चिंतेची बाब – मंत्री अश्विनी वैष्णव

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधकांकडून वापरले जाणारे शब्द ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचं सांगत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी विरोधकांवर टीका केली. सार्वजनिक जीवनात शब्दांची निवड खूप महत्त्वाची असते. त्यामुळे विरोधकांनी असंसदीय शब्द टाळावेत, असं ते म्हणाले.   तत्पूर्वी काही राजकीय पक्षांकडून तात्पुरत्या राजकीय फायद्यासाठी असंसदीय शब्द वापरले जाणं दुर्दैवी असल्याचं मत भाजपचे वक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही व्यक्त केलं. ते नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बो...

July 17, 2024 3:15 PM

आषाढी एकादशी निमित्त प्रधानमंत्री यांनी दिल्या शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशी निमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. विठ्ठालाचा आशीर्वाद सर्वांवर सदैव राहो तसंच आनंद आणि समृद्धीने भरलेला समाज निर्माण होवो असं समाज माध्यमावर सामायिक केलेल्या संदेशात त्यांनी म्हटलं आहे.

July 17, 2024 12:44 PM

केंद्र सरकारनं नीती आयोगाची केली पुनर्रचना

केंद्र सरकारनं नीती आयोगाची पुनर्रचना केली आहे. संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री यांच्यासह कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा पदसिद्ध सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाच्या अध्यक्षपदी कायम असून, सुमन बेरी या उपाध्यक्षपदी कायम राहातील. विशेष निमंत्रितांमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतिन गडकरी, आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचा समावेश आहे. व्ही के सारस्वत, प्रो. रमेश चंद, डॉ व्ही के पॉल आणि आनंद विरमानी हे आयोगाचे पूर्णवेळ सदस्य आहेत.

July 15, 2024 12:29 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे एक्स या समाजमाध्यमावर 10 कोटी अनुयायी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे एक्स या समाजमाध्यमावर 10 कोटी अनुयायी झाले आहेत.यामध्ये गेल्या 3 वर्षात 3 कोटी लोकांची भर पडली.मोदींना आता X वर जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते होण्याचा मान मिळाला आहे.   अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे एकंदर 3 कोटी 8० लाख 6 हजार तर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचे 65 लाख अनुयायी आहेत.या माध्यमावरील चर्चा,वादविवाद,विचार,नागरिकांच्या शुभेच्छा आणि ग्राह्य धरावेत अशा टीका यांची दखल घेणं हा आनंददायी अनुभव असून भविष्यातही संवादाचं हे माध्यम असंच साथ देत राही...

July 15, 2024 11:43 AM

गेल्या १० वर्षांत देशातली हवाई वाहतूक सेवा जगात तिसऱ्या स्थानावर – मुरलीधर मोहोळ

  गेल्या १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशातल्या हवाई वाहतूक क्षेत्रानं मोठी प्रगती केली असून जागतिक पातळीवर हे क्षेत्र तिसऱ्या स्थानावर पोहोचल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल सांगितले.   पुण्याच्या लोहगाव विमानतळावर नव्याने उभारण्यात आलेले टर्मिनल मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवाशांच्या सेवेसाठी खुलं करण्यात आले,त्यावेळी ते बोलत होते.नव्या टर्मिनलवरून विमान प्रवास करणाऱ्या पहिल्या प्रवाशाला यावेळी मोहोळ यांच्या हस्ते बोर्डिंग ...

July 14, 2024 3:03 PM

गेल्या काही वर्षांत ८ कोटी नवीन रोजगारनिर्मिती झाल्याने बेरोजगारीबद्दलच्या अफवा पसरवणाऱ्यांना उत्तर मिळालं – प्रधानमंत्री

गेल्या तीन ते चार वर्षांत आठ कोटी नवीन रोजगारनिर्मिती झाली असून त्यामुळे देशात बेरोजगारीबद्दलच्या अफवा पसरवणाऱ्यांना उत्तर मिळालं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल झालेल्या जाहीर कार्यक्रमात या संदर्भातली आकडेवारी आणि आरबीआयच्या अहवालाचा हवाला देत, देशात कौशल्य विकास आणि रोजगाराची गरज आहे आणि सरकार या दिशेने काम करत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.   अफवा पसरवणारे गुंतवणुकीचे, पायाभूत सुविधांच्या विकासाचे आणि देशाच्या विकासाचे शत्रू आहेत, असं मोदी म्हणाले. महाराष्...

July 14, 2024 7:25 PM

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ड्रंप यांच्यावर निवडणूक प्रचारसभेत हल्ला

  अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. प्रधानमंत्र्यांनी या घटनेचा निषेध केला असून राजकारणात आणि लोकशाहीत हिंसेला कोणतंही स्थान नाही असं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. ट्रंप यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यातल्या मृतांचे कुटुंबीय, जखमी व्यक्ती आणि अमेरिकी नागरिकांच्या दुःखात भारत सहभागी आहे, असंही त्यांनी सांगितलं.    अमेर...

July 14, 2024 12:19 PM

नागरिकाभिमुख उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारमाध्यमांनी सरकारला पाठिंबा दिला पाहिजे – प्रधानमंत्री

नागरिकाभिमुख उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारमाध्यमांनी सरकारला पाठिंबा दिला पाहिजे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जागतिक स्तरावर प्रशंसा झालेल्या ‘एक पेड माँ के नाम’ या पर्यावरण संवर्धन उपक्रमाचं उदाहरण देऊन या उपक्रमाला प्रसारमाध्यमं लोक चळवळ बनविण्यात मदत करू शकतात असं पंतप्रधानांनी सांगितलं.   ‘विकसीत भारत’च्या आगामी २५ वर्षांच्या प्रवासात वर्तमानपत्रं आणि मासिकांची महत्वाची भूमिका असल्याचं नमूद करत लोकांना त्यांच्या ताकदीची जाणीव करून देत असल्याबद्दल त्यांनी प्र...

July 11, 2024 7:38 PM

प्रधानमंत्र्यांचे हस्ते १३ जुलैला गोरेगाव-मुलुंड मार्गातील बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन

गोरेगाव मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यातल्या जुळा बोगदा कामाचं भूमिपूजन १३ जुलै रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. १२ पूर्णांक २० शतांश किलोमीटर लांबीचा गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता हा मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा प्रकल्प आहे.