July 17, 2024 6:34 PM
राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
पंढरपूर इथं राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवनाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलं. विठ्ठल मंदिर संवर्धनासाठी ७३ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पंढरपूर तीर्थक्षेत्र आराखडा पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. शाहू महाराज सांस्कृतिक भवनासाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून त्यात आणखी १० कोटींची भर घालण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.