September 11, 2024 6:04 PM

पालघरमध्ये ग्रामीण भागात आदिवासी कुटुंबासाठी पोषण अभियान उपयुक्त

पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात राहणाऱ्या आदिवासी समुदायातील कुटुंबासाठी पोषण अभियान उपयुक्त ठरत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. किमान या अभियानाच्या माध्यमातून का होईना पण ग्रामीण आणि शहरी भागातल्या माता आणि बालकं आता पोषक आहार घेऊ लागले आहेत.  वळणपाडा अंगणवाडीच्या माध्यमातून या भागातल्या बालकांना ताजा पोषण आहार मिळत आहे. तसचं गर्भवती मातांना देखील टीएचआरच्या माध्यमातून पौष्टिक आहार पुरवला जात आहे. गर्भवती मातांनी कशा प्रकारचा आहार घ्यावा, याबाबतची सर्व माहिती गर्भवती मातांना तिथल्या अ...

September 7, 2024 7:20 PM

पालघर जिल्ह्यात स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिन साजरा

पालघर जिल्ह्यातल्या वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वतीनं आज निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यात आला. पंधराव्या वित्त आयोगातल्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत या दिनाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमांतर्गत विरारमधल्या म्हाडा मैदानात वृक्षरोपण करण्यात आलं. तसचं ‘एक पेड माँ के नाम’ ही मोहिम राबवण्यासाठी आयुक्तांच्या हस्ते स्थानिक स्वयंसेवी संस्था, महिला बचत गटाच्या प्रतिनिधी आदींना रोपांचं वाटप करण्यात आलं.

August 30, 2024 1:39 PM

वाढवण इथं उभारण्यात येणाऱ्या खोल पाण्यातल्या सर्वात मोठ्या बंदराचं आज प्रधानमंत्री करणार भूमीपूजन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून पालघर इथं आज विविध विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत. डहाणू गावात ७६ हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदराचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. आशिया खंडातलं हे खोल पाण्यातलं सर्वात मोठं बंदर असेल आणि जगातल्या आघाडीच्या १० बंदरामध्ये याचा समावेश असेल. या बंदरामुळे १२ लाख लोकांना प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.   पालघरमधे उभारण्यात येणारं वाढवण बंदर देशाच्या विकासात भरीव योगदान देईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ...

August 7, 2024 6:29 PM

पालघर जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन देण्यात येणार आहे. १२ वी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना ६ हजार, आयटीआय किंवा पदविका उत्तीर्ण असणाऱ्यांना ८ हजार तर पदवीधर किंवा पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींना १० हजार विद्यावेतन देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण सहा महिन्यांसाठी असेल.   पालघर जिल्ह्यातल्या उमेदवारासांठी १२ ऑगस्ट रोजी पालघर जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून प्लेसमेंट ड्राईव्हचं आयोजन करण्यात आलं आहे.    उमेदवारांना https://...

August 6, 2024 3:49 PM

पालघर जिल्ह्यात आश्रमशाळेतल्या मुलांना जेवणातून विषबाधा

पालघर जिल्ह्यातल्या नंडोरे इथल्या आश्रमशाळेतल्या मुलांना जेवणातून विषबाधा झाल्याचं लक्षात आलं आहे. उलटी, मळमळ, यासारखा त्रास झाल्यानं या मुलांना आज पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिल्ह्यातल्या आणखी काही आश्रमशाळेतल्या मुलांनाही जेवणातून विषबाधा झाल्याचं दिसून आलं आहे. पालघर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी याबाबत माहिती दिली. या मुलांना रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज असून सध्या ३० मुलं उपचार घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.

July 11, 2024 8:19 PM

पालघरमध्ये युरिया खताचा बेकायदेशीर साठा जप्त

पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातल्या मणिपूर या गावातून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी युरिया खताचा बेकायदेशीर साठा जप्त केला. काल रात्री छापा टाकून युरियाची साठ पोती जप्त केली. जप्त केलेल्या युरियाचा तपासणी अहवाल आल्यानंतर हा नमुना शेतकऱ्यांना पुरविण्यात आलेल्या युरिया खताशी जुळला तर दोषींवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिली.

June 19, 2024 4:24 PM

राज्यात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात

राज्यभरात विविध ठिकाणी आजपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पालघर जिल्ह्यात ५९ रिक्त पदांसाठी पोलिस भरतीला सुरुवात झाली आहे. या पदांसाठी एकूण ३ हजार ५७७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. परीक्षेची मैदानी चाचणी १९ ते २७ जून दरम्यान पालघर मध्ये होणार आहे.   वाशिम जिल्ह्यातही पोलिस दलातल्या ६८ रिक्त जागांसाठी आज सकाळपासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. या जागांसाठी चार हजार २७९ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ही भरती प्रक्रिया पुढील तीन दिवस चालणार आहे.     बुलडाणा जिल्हा पोलिस दला...