September 11, 2024 1:42 PM

पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन केलेल्या गोळीबारात BSF चा एक जवान जखमी

पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन करत जम्मू - काश्मिरमध्ये अखनूर इथल्या नियंत्रण रेषेजवळील भारतीय चौक्यांवर विनाकारण गोळीबार केला. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला. पाकिस्ताननं केलेल्या गोळीबाराला बीएसएफच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं.   मध्यरात्री अडीचच्या सुमारास नियंत्रण रेषेजवळ असलेल्या भारतीय चौक्यांवर गोळीबार केल्याची माहिती बीएसएफच्या प्रवक्त्यानं दिली. या घटनेनंतर जवानांना अधिक सतर्क राहण्याच्या तसंच सीमाभागातील गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

September 10, 2024 1:14 PM

पाकिस्तानमधे तहरीक ए इन्साफ पक्षाच्या काही खासदारांना पोलिसांकडून अटक

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथे काल रात्री माजी प्रधानमंत्री इमरान खान यांच्या तहरीक ए इन्साफ या पक्षाच्या काही खासदारांना पोलिसांनी अटक केली.  या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी इस्लामाबादमध्ये ८ सप्टेंबर रोजी मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र, कार्यकर्त्यांनी यावेळी वाहतुकीचे नियम मोडत सामान्यांसाठी निर्धारित असलेल्या रस्त्यावर मोर्चा नेला. त्यांना रोखणाऱ्या जवानांवर दगडफेक झाल्याने पोलिसांनी संरक्षणासाठी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर या मोर्चेकऱ्यांना अटक झाल्याची ...

September 7, 2024 8:01 PM

पाकिस्तानात सुरक्षा दलांनी आज केलेल्या कारवाईत चार दहशतवादी मारले गेले

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात सुरक्षा दलांनी आज केलेल्या कारवाईत चार आत्मघातकी दहशतवादी हल्लेखोर मारले गेले. या हल्लेखोरांनी मोहम्मद जिल्ह्यातल्या निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर या प्रांतात इतरत्र लपलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी लष्करानं मोहिम  सुरू केली  आहे.

July 14, 2024 3:30 PM

पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान बेकायदेशीर विवाह प्रकरणातून निर्दोष मुक्त

पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बिबी यांना बेकायदेशीर विवाह प्रकरणातून इस्लामाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं आहे.   इम्रान खान यांचा विवाह इस्लामिक कायद्यानुसार झाला नसल्याचा आरोप करत तो रद्दबातल ठरवण्याची मागणी करणारा खटला न्यायलयाने फेटाळला.

June 27, 2024 2:31 PM

पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीची चौकशी करण्याच्या ठरावाला अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाची संमती

  पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीची सखोल आणि स्वतंत्र चौकशी करण्याचा ठराव अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाने संमत केला असून पाकिस्तानमध्ये लोकशाही आणि मानवाधिकारांना पाठिंबा दिला आहे. पाकिस्तानमधे निवडणुकीत झालेल्या कथित अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर निःपक्षपाती आणि स्वतंत्र निवडणूक होण्याची गरज अमेरिकेने व्यक्त केली आहे. दरम्यान, पाकिस्तानमधली राजकीय परिस्थिती आणि निवडणूक प्रक्रिया समजून न घेता हा ठराव केल्याचं पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे.