September 12, 2024 6:04 PM

पद्म पुरस्कार २०२५ साठी नामांकने १५ सप्टेंबरपर्यंत खुली

२०२५ च्या पद्म पुरस्कारांसाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील. यंदा एक मेपासून ही प्रक्रिया सुरू झाली असून awards.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीनं हे अर्ज करायचे आहेत. आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान किंवा सेवा दिलेल्या व्यक्तींविषयीचा सर्व तपशील अर्जासोबत कमाल ८०० शब्दांत जोडावा, असं आवाहन केलेलं आहे. प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारीला हे पुरस्कार जाहीर केले जातील.   

August 16, 2024 3:31 PM

पद्म पुरस्कार २०२५ साठीची नामांकनं १५ सप्टेंबरपर्यंत स्वीकारली जाणार

पद्म पुरस्कार २०२५ साठीची नामांकनं येत्या १५ सप्टेंबर पर्यंत स्वीकारली जाणार आहेत. इच्छुक www.awards.gov.in या संकेत स्थळावर भेट देऊ शकतात.  पद्म पुरस्कार हा देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहे.