September 10, 2024 10:27 AM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं पद्म पुरस्कारांसाठी नामांकन करण्याचं आवाहन
केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी प्रेरणादायी व्यक्तींना नामांकीत करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नामांकन करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर आहे. आतापर्यंत पद्म पुरस्कारांसाठी अनेक व्यक्तींची नावं सुचवल्याबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. गेल्या काही वर्षांत तळागाळात काम करणाऱ्या, प्रसिद्धीपासून दूर असलेल्या व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. या व्यक्तींचं कार्य सर्वांना प्रेरणा देणारं असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सा...