June 27, 2024 8:58 AM

आणीबाणीच्या मुद्द्यावरुन कामकाजाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत गोंधळ

१८ व्या लोकसभेचे सभापती म्हणून भारतीय जनता पक्षाचे खासदार ओम बिर्ला यांची काल आवाजी मतदानानं निवड करण्यात आली. सभापती म्हणून संसदीय मूल्यं आणि लोकशाही परंपरांचं पालन करण्याला आपलं प्राधान्य असेल असं बिर्ला यांनी आपल्या आभाराच्या भाषणात सांगितलं. लोकसभेच्या कामकाजात अडथळे आणण्यापेक्षा चर्चेचा मार्ग अवलंबला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अन्य नेत्यांनी बिर्ला यांचं अभिनंदन केलं.   १९७५ मध्ये देशावर आणीबाणी लादण्याच...

June 21, 2024 1:35 PM

नवी दिल्लीत संसदभवन इथं योगसत्राचे आयोजन

नवी दिल्लीत संसदभवन इथं आज विशेष योग सत्र आयोजित करण्यात आलं होतं. त्याचं नेतृत्व लोकसभेचे माजी सभापती ओम बिर्ला यांनी  केलं. योगाभ्यास हा मानवी आयुष्याचा पाया बनला असून त्यानं सगळ्या सांस्कृतिक सीमा ओलांडल्या आहेत, असं ते यावेळी म्हणाले.  केंद्रीय परराष्ट्रव्यवहार मंत्री एस जयशंकर, आरोग्य मंत्री जे पी नड्डा, माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविय अशा अनेक मान्यवरांनी दिल्लीत योग दिन साजरा केला.