September 25, 2024 7:57 PM
तेलाच्या दरात सुमारे २ टक्के घसरण
कच्च्या तेलाचा सगळ्यात मोठा आयातदार असलेल्या चीनचा आर्थिक विकास आराखडा तिथल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सक्षम ठरेल का या बाबतच्या उलटसुलट चर्चांमुळे आज तेलाच्या दरात सुमारे दोन टक्के घसरण झाली. जागतिक बाजारात आज तेलाचा दर ७३ डॉलर ७१ सेंट प्रतिबॅरल इतका राहिला.