July 8, 2024 11:00 AM
उत्तर भारतात मुसळधार पावसाचा इशारा
येत्या 4-5 दिवसांत देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर तसंच ईशान्य भारताच्या अनेक भागांमध्ये आणि उत्तर प्रदेशात; मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. उत्तर प्रदेशात आज, आणि 10-11 तारखेलाही तुरळक ठिकाणी, अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ओडिशामध्ये उद्या तर; आज आणि उद्या बिहारमध्ये; मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने, मध्य ...