September 23, 2024 7:14 PM

शेअर बाजारामधल्या व्यवहारांमध्ये दिवसभरात तेजी

शेअर बाजारामधल्या व्यवहारांमध्ये दिवसभरात तेजी दिसून आली. सकाळच्या सत्रातच शेअर बाजारानं आतापर्यंतचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. दुपारच्या सत्रातही तेजी कायम राहिली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३८४ अंकांची वाढ नोंदवत ८४ हजार ९८० अंकांच्या नवा उंचीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही१४८ अंकांची वाढ नोंदवत २५ हजार ९३९ अंकांच्या विक्रमी उंचीवर बंद झाला. 

July 29, 2024 1:47 PM

शेयर बाजारात आज सकाळच्या सत्रात नव्या उच्चांकाला स्पर्श

भारतीय शेअर बाजार सकाळच्या सत्रात विक्रमी तेजीवर उघडला.  सुरुवातीलाच सेन्सेक्सनं ८१ हजार ७४९ चा तर  निफ्टीनं २४ हजार ९८० चा आतापर्यंतचा उच्चांक गाठला. छोट्या तसंच मध्यम शेअर्समध्येही तेजीचा परिणाम दिसून येत आहे. अमेरिकन शेअर बाजारानं शुक्रवारी बंद होताना सकारात्मक तेजी गाठली होती. सर्व आशियाई शेअर बाजारात तेजीचा प्रभाव दिसून येत आहे.