September 15, 2024 2:58 PM

एनआयए आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकांमध्ये सहकार्य आणि समन्वय वाढण्याची गरज – गृहमंत्री अमित शहा

दहशतवाद विरोधातली संरचना बळकट करण्यासाठी NIA अर्थात राष्ट्रीय तपास संस्था आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकांमध्ये सहकार्य आणि समन्वय वाढण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं झालेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेत बोलत होते.   जम्मू-काश्मीर, कट्टर डावी विचारसरणी आणि  आणि ईशान्य भारतातील राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित समस्या सोडवण्याच्या अनुषंगानं झालेल्या प्रगतीबद्दल तसंच माओवादा विरोधातल्या प्रयत्नांमध्ये यश मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक...

September 13, 2024 3:30 PM

पंजाब : भारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तान समर्थक हल्ल्याच्या चौकशीप्रकरणी NIA ची कारवाई

कॅनडातल्या भारतीय उच्चायुक्तालयावर झालेल्या हल्ल्याच्या चौकशीच्या संदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेनं आज पंजाबमधल्या मोगा, अमृतसर, गुरदासपूर आणि जालंधरमध्ये तपासणी केली. गेल्या वर्षी, संस्थेनं ओटावा इथल्या भारतीय दुतावासाबाहेर खलिस्तानी समर्थकांनी केलेल्या निषेधाबद्दल गुन्हा दाखल केला होता. हल्ल्यामागे खलिस्तान समर्थकांचा हात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

September 10, 2024 6:51 PM

लाओस इथल्या लॉन्ग चेंग कंपनीच्या सीईओ विरोधात एनआयएची कारवाई

एनआयए, अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं आज लाओस इथल्या लॉन्ग चेंग कंपनीच्या सीईओ विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावरची मानवी तस्करी आणि सायबर फसवणूक प्रकरणी आरोपपत्र दाखल केलं. एनआयए मुंबईनं या वर्षी अटक केलेला सुदर्शन दराडे, या प्रकरणातला प्रमुख आरोपी आहे. एनआयए नं दराडे याच्या मोबाईल मधून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी स्वरूपाचं साहित्य जप्त केलं असून या प्रकरणातल्या आणखी दोन फरार आरोपींबाबतचे तपशील  गोळा केले आहेत. यात एका परदेशी नागरिकाचा समावेश आहे. दराडे याच्या  लाओस मधल्या  लॉन्ग चेंग या कंपनीच्या मा...

August 29, 2024 1:47 PM

विशाखापट्ट्णम इथं पाकिस्तानच्या हेरगिरीप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे देशभरात छापे

आंध्रप्रदेशात विशाखापट्ट्णम इथं पाकिस्तानच्या हेरगिरीप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले. गुजरात, कर्नाटक, केरळ, तेलंगण, उत्तरप्रदेश, बिहार, आणि हरयाणामधे मिळून १६ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.   या कारवाईत २२ मोबाईल फोन्स, आणि  अनेक गोपनीय कागदपत्रं मिळाली असल्याचं एनआयीएने सांगितलं. भारतीय नौदलासंबंधी महत्वाची आणि गोपनीय माहिती चोरणं आणि भारत विरोधी कारस्थान करणं या आरोपांखाली एनआयए ने गेल्यावर्षी दोन जणांवर आरोपपत्र दाखल केलं आहे.

July 12, 2024 3:34 PM

औरंगाबाद प्रारूप प्रकरणी इसिसच्या दोन सदस्यांवर आरोपपत्र दाखल

औरंगाबाद प्रारूप प्रकरणी इसिसच्या दोन सदस्यांवर राष्ट्रीय तपास संस्थेनं आज आरोपपत्र दाखल केलं. दहशतवादी कारवाया प्रकरणात सहभाग, देशभरातल्या युवकांची दहशतवाद प्रकरणात सहभागी होण्यासाठी नियुक्ती करण्याचं काम त्यांच्याकडे होतं, असं यात नमूद केलं आहे. फेब्रुवारी महिन्यात यापैकी एका आरोपीला NIA नं पकडलं होतं.

July 8, 2024 10:46 AM

अमली पदार्थांचा वापर करुन दहशतवादाला बळ देणाऱ्या फरार आरोपीला एनआयएकडून अटक

जम्मू आणि काश्मीरमधील अमली पदार्थांच्या वापर करुन दहशतवादी कारवाया करणाऱ्या गटातील प्रमुख फरार आरोपीला राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIA नं काल अटक केली. सय्यद सलीम जहांगीर अंद्राबी उर्फ सलीम अंद्राबी जून 2020 पासून फरार होता. या अटकेमुळे नार्को-दहशतवाद संबंध नष्ट करण्याच्या आणि भारतात अमली पदार्थांचा वापर करुन दहशतवादी गटाला बळ देण्याचा प्रयत्न करणाऱ्या परिसंस्थेला उद्ध्वस्त करण्याच्या सुरक्षा यंत्रणांच्या प्रयत्नांना मोठं यश मिळालं असल्याचं NIA नं म्हटलं आहे.   जम्मू आणि काश्मिर तसंच देशभर...

June 21, 2024 12:17 PM

लखबीर सिंग संधू दहशतवाद्याशी संबंधित प्रमुख दहशतवाद्याला अटक

बब्बर खालसा इंटरनॅशनल या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेवर कारवाई करत राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने पंजाबमधील फिरोजपूर येथून लखबीर सिंग संधू या दहशतवाद्याशी संबंधित असलेल्या, जसप्रीत सिंग या आणखी एका प्रमुख दहशतवाद्याला अटक केली आहे. त्याच्याकडून शस्त्रास्त्र तसंच अंमली पदार्थ आणि दोन लाखांहून अधिक किमतीची रोकड आणि विविध संशयास्पद डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली.