June 23, 2024 8:01 PM
देशात १ जुलैपासून नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी
देशात फौजदारी कायद्यासंदर्भात करण्यात येणाऱ्या सुधारणांबाबत एक चर्चासत्र आज चेन्नईत झालं. भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष्य अधिनियम, आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या तीन नवीन कायद्यांची अंमलबजावणी येत्या १ जुलैपासून होणार असून त्यासंदर्भात प्रबोधन करण्यासाठी हे चर्चासत्र झालं. केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांचं भाषण चर्चासत्रात झालं. भारतीय दंड संहितेसारखे कायदे वसाहतवादी ब्रिटिश सरकारने केवळ भारतीयांना शिक्षा देण्यासाठी बनवले होते. आता सर्व राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदे...