September 15, 2024 1:39 PM

बेल्जियमध्ये ब्रुसेल इथं झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत नीरज चौप्राला रौप्य पदक

बेल्जियमध्ये ब्रुसेल इथं झालेल्या डायमंड लीगचं सलग दुसऱ्यांदा रौप्य पदक नीरज चोप्रानं पटकावलं. नीरजनं ८७ पूर्णांक ८६ मीटर अंतरावर भाला फेकला, त्याचं सुवर्णपदक केवळ एका सेंटीमीटरनं हुकलं. या स्पर्धेत अँडरसन पीटर्स सुवर्ण तर जर्मनीच्या ज्युलियन वेबर यानं कांस्य पदक पटकावलं.

September 13, 2024 10:18 AM

नीरज चोप्रा आणि अविनाश साबळे डायमंड लीग फायनलमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व

ब्रुसेल्स इथं आजपासून सुरू होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत भारताचं प्रतिनिधित्व पॅरिस ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे करणार आहेत. यंदा डायमंड लीगमधील अलियान्झ मेमोरियल व्हॅन डॅमे स्पर्धेत हे क्रिडापटू विजयासाठी लढत देतील. सध्या 14व्या क्रमांकावर असलेला भारताचा स्टीपलचेसर अविनाश साबळे आज डायमंड लीगच्या अंतिम फेरीत पदार्पण करेल. त्याचा सामना इथिओपियाचे सॅम्युअल फायरवू, गेटनेट वले, केनियाचे आमोस सेरेम आणि अब्राहम किबिवोट यांच्याशी होईल, तर स...

August 23, 2024 10:06 AM

लुसान डायमंड लीग अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानावर

भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रानं स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या लुसान डायमंड लीग अजिंक्यपद स्पर्धेत दुसरं स्थान पटकावलं. नीरजने ८९ पूर्णांक ४९ मीटर अंतरावर भालाफेक करत या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.   [video width="644" height="360" mp4="https://www.newsonair.gov.in/wp-content/uploads/2024/08/vwMTIVaZyOpazx2f-1.mp4"][/video]

August 9, 2024 6:05 PM

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा यांना रौप्यपदक

पॅरिस ऑलिम्पिकच्या कालच्या दिवशी भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा यानं रौप्यपदकावर नाव कोरलं, तर पुरुष हॉकी संघानं कांस्यपदकाला गवसणी घातली. या कामगिरीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचं कौतुक केलं आहे. संपूर्ण देशाला नीरजचा अभिमान आहे आणि त्याच्या कामगिरीमुळे येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा मिळेल, अशा शब्दांत राष्ट्रपतींनी त्याची प्रशंसा केली. नीरजनं नेहमीच त्याची प्रतिभा दाखवून दिली आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत...

August 8, 2024 12:42 PM

पॅरिस ऑलिंपिकमध्ये आज नीरज चोप्रा पुन्हा मैदानात उतरणार

पॅरिस ऑलिम्पिक मध्ये आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा आज पुन्हा आपलं जेतेपद कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.   तर पुरुष हॉकी संघाची कास्य पदकासाठी स्पेन बरोबर लढत होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार नीरज चोप्राचा सामना रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी सुरू होईल. तर पुरुष हॉकी संघाचा सामना संध्याकाळी ५ वाजता होणार आहे.   कुस्ती मध्ये अमन सहरावत पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात तर अंशु महिलांच्या ५७ किलो वजनी गटात, फ्री स्टाइल कुस्ती प्रकारात मैदान...

August 6, 2024 7:04 PM

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राचा अंतिम फेरीत प्रवेश

  पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रानं अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. पात्रता फेरीत ब गटातून पहिल्याच प्रयत्नात त्यानं ८९ पूर्णांक ३४ शतांश मीटर इतका लांब भाला फेकला. या हंगामातली नीरजची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.  महिलांच्या ५० किलो वजनी गटातल्या कुस्ती स्पर्धेत विनेश फोगाटनं उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानं ऑलिम्पिक पदक मिळवण्याचं तिचं स्वप्न कायम आहे. विनेशनं उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या ओकसाना लिवाच हिला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तत्पूर्वी उपउपांत्यपूर्व फेरीत विन...

June 19, 2024 2:26 PM

विश्व एथलेटिक्स कॉन्टिनेंटल गोल्ड टूर स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राला सुवर्ण पदक

भारताचा ऑलिम्पिक आणि विश्वविजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याने फीनलंड इथ सुरू असलेल्या विश्व एथलेटिक्स कॉन्टिनेंटल गोल्ड टूर स्पर्धेत काल सुवर्ण पदक पटकावलं. काल रात्री उशिरा झालेल्या सामन्यात नीरजनं तिसऱ्या प्रयत्नात ८५ पूर्णांक ९७ शतांश मीटर अंतरा वर भालाफेक करून हे यश मिळवलं. तत्पूर्वी त्याने पहिल्या प्रयत्नांत ८३ पूर्णांक ६२ शतांश मीटर अंतरावर भाला फेक करून आपल्या खेळाची सुरुवात केली होती.