August 23, 2024 8:13 PM

पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन देशभरात विविध कार्यक्रमांनी साजरा

पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन आज साजरा झाला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर गेल्या वर्षी याच दिवशी भारताचं चांद्रयान उतरलं होतं. या प्रीत्यर्थ देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाल्या होत्या.  भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अंतराळ क्षेत्रातल्या प्रगतीमधे केलेल्या कामगिरीचा त्यांनी  गौरव केला. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते इस्रोच्या रोबोटिक चॅलेंज आणि भारतीय अंतरिक्ष हॅकेथॉनच्या विजेत्यांना परितोषिके प्रदान ...

August 14, 2024 1:30 PM

२३ ऑगस्ट हा दिवस ‘अंतराळ दिन’ म्हणून साजरा

भारत गेल्या वर्षी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चांद्रमोहीम राबवणारा चौथा देश आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या परिसरात पोहोचलेला जगातला पहिलाच देश ठरला. या यशाच्या सन्मानार्थ दरवर्षी २३ ऑगस्ट हा दिवस अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे.    मोहिमे संदर्भात विविध शाखांमधल्या लोकांसाठी अमर्याद संधी या विषयीचे उपक्रम होणार आहेत. इस्रोचे शास्त्रज्ञ आणि बेंगळुरुच्या यू आर राव उपग्रह केंद्राचे संचालक एम संकरन यांनी आकाशवाणीला या उपक्रमांची विस्तृत माहिती दिली.