September 5, 2024 3:41 PM
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांचं वितरण
देशभरात आज शिक्षक दिवस साजरा होत असून यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दरवर्षी ५ सप्टेंबर हा माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस, राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शालेय शिक्षण क्षेत्राचा दर्जा उंचावण्याबरोबर विद्यार्थ्यांचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी योगदान दिलेल्या ८२ शिक्षकांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार दिले जाणार आहेत. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालेल्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले कलाशिक्षक सागर बगाडे आणि गडचिरोली ...