September 16, 2024 6:57 PM

धनगर समाजाचा समावेश आदिवासींमध्ये करणं चुकीचं असल्याची विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भूमिका

धनगरांचा समावेश आदिवासी जमातीमध्ये करणं चुकीचं असून त्याला संपूर्ण आदिवासी समाजाचा विरोध कायम असेल. असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते.  धनगर जातीचा आदिवासी जमातीमध्ये समावेश करण्यासाठी लवकरच जीआर काढण्याकरता एक समिती स्थापन करण्याचा निर्णय नुकताच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आयोजित धनगर समाजाच्या नेत्यांची बैठकीत झाला. मुख्यमंत्र्यांनी किमान आमच्या खात्याच्या मंत्र्यांना किंवा राज्यातल्या दोन वरिष्ठ प...