September 9, 2024 3:40 PM

नंदुरबारमधल्या बाल हुतात्म्यांना ८२ व्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून मानवंदना

स्वातंत्र्याच्या लढ्यात कोवळ्या वयात आहुती देणाऱ्या नंदुरबारमधल्या बाल हुतात्म्यांना आज ८२ व्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. महात्मा गांधीजींच्या चलेजाव च्या नाऱ्याने प्रेरीत होऊन स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेणारे बाल हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्यासह त्यांचे मित्र लालदाद शहा, धनसुकलाल वाणी, शशीधर केतकर, घनश्यामदास शहा यांच्यावर इंग्रज पोलिसांनी बेछूट गोळीबार केला होता. जिल्हा प्रशासनासह, जेष्ठ नागरीक आणि शालेय विद्यार्थ्यांनी देखील शहीद स्थळावर जाऊन हुतात्म्...

September 7, 2024 7:08 PM

नंदुरबार जिल्ह्यात दहा जणांना अतिसार सदृश्य आजाराची लागण

नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातल्या लांबोळा गावात दहाजणांना अतिसार सदृश्य आजाराची लागण झाली असल्याचं आढळून आल़ं आहे. या आजारानं बाधित एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चारजणांवर जिल्हा सामान्य रुग्णालय तर अन्य दोन महिलांवर शहादा इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इतर रुग्णांची प्रकृती स्थिर असून आरोग्य यंत्रणा परिस्थीतीकडं  बारकाईनं लक्ष ठेवून आहे.

September 5, 2024 3:41 PM

नंदुरबार शहरात विद्यार्थीनीचा विनयभंग झाल्याप्रकरणी मूक मोर्चा

नंदुरबार शहरातल्या एक शाळेत पाचवीच्या विद्यार्थीनीचा विनयभंग झाल्या प्रकरणी आज सकल मराठा समाजाच्यावतीने मूक मोर्चा काढण्यात आला. गेल्या आठवड्यात झालेल्या या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटत आहेत. या प्रकरणी पोलीसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याची रवानगी कोठडीत झाली आहे. मात्र यात शाळा मुख्याध्यापक आणि संचालकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार आहेत. यातील दोषीचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा सोबतच दोषींना फाशीची शिक्षा करावी अशी मागणी यावेळी मोर्चकऱ्यांकडून करण्यात आली. या मोर्चामध्ये महिला आणि ...

August 8, 2024 7:18 PM

नंदुरबार जिल्ह्यात ४ लाखांपेक्षा जास्त कुटुंबांना ३ गॅस सिलेंडर मोफत

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातून ४ लाखांपेक्षा जास्त कुटुंबांना वर्षाला ३ मोफत गॅस सिलेंडर रिफील करून दिले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी इंधन कंपन्यांच्या विक्री अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिली. सदर योजनेत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना फायदा होणार आहे

August 8, 2024 7:01 PM

नंदुरबार इथं तीन दिवसीय आदिवासी महोत्सवाचं आयोजन

जागतिक आदिवासी दिनानिमित्त नंदुरबार इथं तीन दिवसीय आदिवासी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवा अंतर्गत  नंदुरबार शहरातून आज भव्य रॅली काढण्यात आली.  यात राज्यभरातून आलेल्या आदिवासी कलापथकांनी विविध नृत्याविष्कार सादर केले. राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे तारपा वाद्य वाजवत या रॅलीत सहभागी झाले होते.   [video width="848" height="394" mp4="https://www.newsonair.gov.in/wp-content/uploads/2024/08/123.mp4"][/video]

July 19, 2024 7:08 PM

नंदुरबार : प्रलंबित वनदावे मार्गी लावण्यासाठी बैठका घेण्याचे निर्देश

नंदुरबारमधले प्रलंबित वन दावे वर्षभरात मार्गी लावण्यासाठी तालुकानिहाय चार सदस्यीय समितीची स्थापन करुन दर महिन्याला आढावा बैठका घेण्याचे निर्देश दिल्याचं राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष  अंतरसिंग आर्या यांनी आज सांगितलं. ते नंदुरबारच्या दौऱ्यावर असून जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.  पाच हजारांहून अधिक आदिवासी बांधवांनी वनदाव्यांविषयी आपल्याकडे तक्रारी केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी तळोदा तालुक्यात आमलाड इथल्या आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहाची पाहणी...