September 26, 2024 7:10 PM

नांदेडमध्ये ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत अवैध धंद्यांवर कारवाई

नांदेडमध्ये ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत जिल्ह्यातल्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली. यात ५ कोटी २६ लाख रुपयांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ८ ऑगस्टपासून ऑपरेशन फ्लश आऊट सुरू झालं आहे. जुगार, मटका, गुटखा विक्री, वाळू तस्करी, अंमली पदार्थांची विक्री, रेशनचा काळा बाजार रोखण्यासाठी पोलिसांनी सहा पथकं स्थापन केली आहेत. आतापर्यंत ७५६ गुन्हे दाखल झाले असून एक हजार आरोपींविरोधात कारवाई करण्यात आली आहे.  

September 9, 2024 4:01 PM

नांदेडमध्ये मंत्री अनिल पाटील यांनी अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा

नांदेड इथं अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज आढावा घेतला. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीत नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यातल्या नुकसानाची माहिती सादर केली. या बैठकीनंतर अनिल पाटील, नांदेड तालुक्यातल्या कासारखेडा, आलेगाव आणि निळा या गावांना भेटी देऊन पाहणी करणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान, स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी आज सकाळी नांदेड जिल्ह्यातल्या अतिवृष...

August 30, 2024 6:35 PM

काँग्रेस आमदार जितेश अंतापुरकर यांचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा

नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापुरकर यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांचं मत फुटल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात होता, अशा आमदारांना यापुढं तिकीट दिलं जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसनं घेतली होती. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे. 

August 26, 2024 7:28 PM

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं आज पहाटे निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैद्राबादमधल्या रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या सकाळी अकरा वाजता नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सरपंच, विधानपरिषद, विधानसभेचे सदस्य ते लोकसभेचे खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. याशिवाय शिक्षण, सहकार आणि कृषी क्षेत्रात त्यांनी महत्व...

August 25, 2024 7:08 PM

नांदेड रेल्वे स्थानक आगामी काळात देशातलं सर्वोत्तम रेल्वे स्थानक होईल – राज्यमंत्री रवनीत सिंग

नांदेडचं रेल्वे स्थानक हे येत्या कालावधीत सर्व सोयीसुविधांनी युक्त असलेलं देशातलं सर्वोत्तम रेल्वे स्थानक करण्यात येईल, असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीतसिंघ यांनी म्हटलं आहे. गुरुद्वारा शहीद बाबा भुजंग सिंघजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पंच तख्त साहिबांच्या दर्शनाची विशेष रेल्वे यात्रा सुरु करण्यात आली आहे. आज नांदेड इथून रवनीतसिंघ यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं, त्यानंतर ते बोलत होते.   तेराशे भाविकांना घेऊन ही यात्रा नांदेड इथून पटना, दिल्ली, अनंतसाहिब फतेहगड साहिब सरह...

July 18, 2024 3:26 PM

विधानसभा निवडणूक : नांदेडमध्ये २५ जुलैला प्रारूप यादी प्रसिद्ध होणार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात येत्या २५ जुलै रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. या यादीत आपलं नाव नसेल तर ते समाविष्ट करण्यासाठी मतदारांना ९ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. मतदार या कालावधीत यादीतल्या नावांमध्ये दुरुस्ती, पत्त्यामध्ये बदल, नाव वगळणीही करू शकतील. ९ ऑगस्टनंतर ही प्रारुप यादी अंतिम केली येईल आणि २० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.    [video width="848" height="478" ...