September 18, 2024 7:14 PM

राहुल गांधींची हत्या करण्याच्या, त्यांना इजा पोहेचवण्याच्या धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – नाना पटोले

लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना इजा पोहचवण्याच्या धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. या मागणीसाठी काँग्रेस उद्या राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत दिली.  गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांचे नेते राहुल गांधी यांची हत्या करण्याच्या, त्यांना शारीरीक इजा पोहोचवण्याच्या धमक्या देत आहेत. हे अत्यंत गंभीर आहे. या संदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प...

September 16, 2024 2:54 PM

मविआ राज्यात सत्तेत आल्यावर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू होणार – नाना पटोले

महाविकास आघाडीचं सरकार राज्यात सत्तेत आल्यावर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. शिर्डी इथं आयोजित  निवृत्तीवेतन राज्य महा अधिवेशनात ते बोलत होते. जुनं निवृत्तीवेतन हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे, असं पटोले म्हणाले.   राज्यात अडीच लाख सरकारी पदं रिक्त असून महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर ही पदं भरली जातील असं आश्वासनही त्यांनी दिलं. या अधिवेशनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार सत्यजित तां...

September 15, 2024 8:14 PM

महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आश्वासन

महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. शिर्डी इथं पेन्शन राज्य महाअधिवेशनात बोलत होते.  या अधिवेशनाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आणि इतर नेते  उपस्थित होते. पटोले यांनीही त्यांच्या भाषणात हे आश्वासन दिलं. जुनी पेन्शन योजना काँग्रेसच्या काळात सुरु होती, ती अटल बिहारी वाजपेयी सरकारनं बंद केली. आणि आता भाजपा काँग्रेसवर आरोप करत आहे. पण काँग्रेसचं सर...

September 11, 2024 8:02 PM

राहुल गांधी यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून भाजपा खोटा प्रचार करत आहे – नाना पटोले

राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून भाजपा खोटा प्रचार करत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मी आरक्षण विरोधी नाही, आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त मिळावे”, ही भूमिका असल्याचं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भाजपानं कितीही खोटं सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते त्यांचा आरक्षणविरोधी चेहरा लपवू शकत नाहीत, असं पटोले यांनी म्हटलं आहे. 

August 24, 2024 10:15 AM

महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला उच्च न्यायालयाकडून मनाई

महाराष्ट्रात, बदलापूर इथं लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीनं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती; मात्र यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं काल एका सुनावणी याचिकेवर मनाई केली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणी न्यायालयानं महाविकास आघाडीचे घटक पक्ष, राज्य सरकार आणि गृहविभागाला नोटीस बजावली असून त्यात न्यायालयानं दिलेल्या आदेशांचं पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

August 23, 2024 6:08 PM

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत राज्यभरातल्या जागांबाबत अद्याप चर्चा सुरू – नाना पटोले

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत राज्यभरातल्या जागांबाबत अद्याप चर्चा सुरू असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितलं. विधानसभा निवडणुकीसंदर्भात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे राज्यातले प्रमुख नेते नाशिकमध्ये आले असता वार्ताहर परीषदेत पटोले यांनी ही माहिती दिली.   राज्यातल्या महायुती सरकारनं कायदा-सुव्यवस्था संपुष्टात आणली आहे, अशी टीका त्यांनी केली. बदलापूर प्रकरणात उच्च न्यायालयानं स्वत:हून दखल घेऊनही सरकार त्या आंदोलनाला राजकारणाने प्रेरित म्...

August 22, 2024 3:49 PM

बदलापूर अत्याचार प्रकरणात पोलिसांवर दबाब टाकण्यात आल्याचा नाना पटोले यांचा आरोप

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातली संबधित शाळा भाजपा आणि आरएसएस विचारांची असल्यानं पोलिसांवर दबाब टाकण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते मुंबईत वार्ताहर  परिषदेत बोलत होते. शाळेच्या संस्था चालकांवर दबाव आणून १२ आणि १३ तारखेचे सीसीटीव्ही फूटेज गायब करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. २४ तारखेला महाविकास आघाडीच्या आंदोलनात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

August 21, 2024 7:07 PM

बदलापूरमधील लहान मुलींवरील अत्याचारप्रकरणी २४ तारखेला मविआचा ‘महाराष्ट्र बंद’

बदलापूरमध्ये लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं येत्या शनिवारी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला असल्याचं  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितलं. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर  मुंबईत ते वार्ताहरांशी बोलत होते.  राज्यात लहान मुलं, महिलांवरच्या अत्याचाराच्या प्रकरणात अनेक पटींनी वाढ झाली आहे. त्यामुळं हा बंद पुकारल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. याच मुद्द्यावर काँग्रेसनं आज मंत्रालयासमोर आंदोलन केलं. विरोधी पक्षन...

August 15, 2024 3:44 PM

प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीमुळे देशाच्या प्रगतीचा पाया रचला – नाना पटोले

शेतकरी, कामगार आणि जवानांनी हा देश उभा केला असून देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीमुळे देशाच्या प्रगतीचा पाया रचला गेला, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. मुंबईत टिळक भवन मुख्यालयात नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसने मोठा संघर्ष केला तसंच नेहरूंनी यासाठी अनेक वर्षे तुरुंगवास भोगला याची आठवणही पटोले यांनी करून दिली. 

August 7, 2024 8:35 PM

महाविकास आघाडी म्हणून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची काँग्रेसची भूमिका

महाविकास आघाडीत कोणताही पक्ष ‘छोटा भाऊ, मोठा भाऊ’ नाही, महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर होईल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितलं.   विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज मुंबईत गांधीभवनात झाली. त्यानंतर पटोले बातमीदारांशी बोलत होते.   आजच्या बैठकीत जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाली, तसंच राज्यातल्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. जागा वाटपाचा निर्णय गुणव...