September 20, 2024 3:41 PM

विरोधकांनी राज्याला बदनाम करण्याचे धोरणआखल्याची मुख्यमंत्र्यांची टीका

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे राज्यात विविध प्रकल्पांची सुरुवात आणि पायाभूत सुविधांचा विकास होत आहे. मात्र, राज्याला बदनाम करण्याचे धोरण विरोधकांनी आखल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.   नागपूर विमानतळावर काल ते वार्ताहरांशी बोलत होते.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे ते जनतेची दिशाभूल करत असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

September 15, 2024 7:14 PM

अभियंता दिनानिमित्त नागपूरमध्ये राज्यस्तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्रदान

अभियंता दिनानिमित्त आज नागपूरमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते राज्यस्तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्रदान करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उत्‍कृष्‍ट कार्य करणारे अभियंते, वास्‍तुशास्‍त्रज्ञ, अतांत्रिक संवर्गातील कर्मचारी यांचा सत्‍कार करण्‍यात आला, तसंच उत्‍कृष्‍ट प्रकल्‍प पुरस्‍कार देखील वितरीत करण्‍यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागात देश उभारणीची मोठी ताकद असल्याचे गौरवोद्गार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी काढले. 

September 14, 2024 7:44 PM

नागपुरात गरजू विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र वितरित

दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असून त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न सोडवल्यानं आपल्याला समाधान मिळतं, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. नागपूर इथं आधार संस्था आणि वेकोलिच्या संयुक्त विद्यमाने गरजू विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र वितरित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. आपण आतापर्यंत ४० हजार दिव्यांगांना उपयोगी पडणारं साहित्य वितरित केलं आहे, ८० दिव्यांगांना कृत्रिम पाय लावून देण्यासाठी मदत केली आहे असं गडकरी यांनी सांगितलं. संपूर्ण विदर्भातल्या दिव्यांगांना दिव्यागांना आवश्यक साहित्य वाट...

September 9, 2024 6:58 PM

नागपूर इथल्या मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने पावलं उचलण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नागपूर इथल्या मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने पावलं उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली.  मिहान प्रकल्पांतर्गत विकसित भूखंडासाठी आकारण्यात येणारं शुल्क योग्य असावं तसंच प्रकल्पाच्या निधीसाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव बैठकीसमोर सादर करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. मिहान परिसरातल्या ग्रामपंचायत क्षेत्रात बांधण्यात आलेली व्यापारी संकुलं ही...

September 7, 2024 11:58 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुती सरकारचे प्रमुख असून त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊ”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा स्पष्ट केलं आहे. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. “मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याचा अधिकार आपल्याला नसून हा निर्णय भाजपाचं संसदीय मंडळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मिळून घेतील. हा निर्णय निवडणुकीच्या आधी घ्यायचा की नंतर हे तेच ठरवतील, असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत कसलाही संभ्रम नाही”, असंही...

September 3, 2024 7:02 PM

नागपुरात तान्ह्या पोळ्यानिमित्त मारबत आणि बडग्याची मिरवणूक

तान्ह्या पोळ्यानिमित्त नागपुरात आज मारबत आणि बडग्याची  मिरवणूक काढण्यात आली. नागपुरातल्या जागनाथ बुधवारी परिसरातून पिवळी मारबत, तर नेहरू पार्क इतवारी इथून काळ्या मारबतीची मिरवणूक निघाली. या मारबत उत्सवाला १४४ वर्षांची परंपरा आहे. वर्षभरातल्या विविध घटना आणि विषयांवर भाष्य करणाऱ्या बडग्यांची देखील मिरवणूक काढली जाते. यंदा चिकुनगुनिया, डेंग्यू, रस्त्यातले खड्डे, महिलांवरचे अत्याचार, भ्रष्टाचार महागाई, वाढती बेरोजगारी विषयांवरच्या बडग्यांनी नागरिकांचं लक्ष वेधलं.    वाशिममधे तान्ह्या पोळ्यानिम...

August 7, 2024 3:50 PM

नागपुरात इतवारी बाजारपेठेत अत्तराच्या गोदामाला आग, एकाचा मृत्यू

नागपूर शहरातल्या इतवारी या मुख्य बाजारपेठेत अत्तराच्या गोदामाला लागलेल्या आगीत एका तरुणीचा होरपळून मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली. दुर्घटनेतल्या जखमींमध्ये एका जोडप्याचा समावेश असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. गोदामात अत्तर आणि चप्पल तसंच प्लास्टिक असल्यानं आग फैलावली आणि बचावात अडचणी आल्याची माहिती अग्निशमन दलानं दिली आहे.

August 2, 2024 6:31 PM

नागपूरसाठी १२०० कोटींहून जास्त निधीचा विकास आराखडा मंजूर – उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर जिल्ह्यासाठी बाराशे कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीचा विकास आराखडा जिल्हा नियोजन विकास बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ५ हजार कोटीपेक्षा जास्त मूल्याची कामं राज्य शासनाच्या वतीने करण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी समितीच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना दिली. नागपूर शहरात सगळीकडे विकासकामं सुरू असल्याने खोदकाम आणि वाहतूक वळवण्यात आल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे, पण ही कामं वेगाने पूर्ण करू, असं आश्वासनही फ...

July 20, 2024 8:33 PM

नागपूरच्या १३७ गावांमध्ये बीएसएनएलची 4-जी सेवा उपलब्ध

महाराष्ट्रातल्या नागपूर जिल्ह्यातल्या १३७ गावांमध्ये जेथे कुठलीही मोबाईल सेवा नव्हती तेथे बीएसएनएलची 4 -जी सेवा आता उपलब्ध होत आहे. देशात 4-जी स्तरावरची मोबाईल सेवा असली पाहिजे या उद्देशाने देशातल्या १ लाख गावांपैकी ज्या ३४ हजार गावात कोणतीही सेवा नव्हती त्याठिकाणी बीएसएनएलच्या 4 जी सेक्युरेशन प्रोजेक्टच्या अंतर्गत बीटीएस टॉवर लावून 4-जी सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प बीएसएनएलने हाती घेतला आहे. या माध्यमातून नागपूर-मध्य प्रदेश सीमेवरच्या पारशिवनी, रामटेक अशा तालुक्यातल्या दुर्गम गावांमध्ये सु...

July 1, 2024 2:55 PM

यवतमाळ नागपूर महामार्गावर चापरदा गावाजवळ झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू

यवतमाळ नागपूर महामार्गावर चापरदा गावाजवळ झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे ४ च्या सुमारास वेगवान इनोव्हा गाडी आणि ट्रकवर धडकून हा भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या इनोव्हा कारमधील प्रवासी पंजाबहून नांदेडच्या गुरुद्वारा साहेब इथे दर्शनासाठी जात होते.