September 12, 2024 10:22 AM

नागालँडच्या तीन जिल्ह्यांमध्ये अंतर्गत निवास परवाना लागू करायला राज्य सरकारची मंजुरी

नागालँडमध्ये तीन जिल्ह्यांमध्ये अंतर्गत निवास परवाना म्हणजे आयएलपी लागू करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. चुमोकेडिमा, निउलँड आणि दिमापूर या जिल्ह्यांमध्ये आयएलपी लागू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री नेफिऊ रिओ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नागालँडचे रहिवासी नसलेल्या नागरिकांना या जिल्ह्यांमध्ये प्रवेशासाठी आयएलपी लागणार आहे. हा परवाना लागणाऱ्या नागरिकांची विभागवारी करण्यात आली आहे.

September 7, 2024 12:28 PM

नागालँडमध्ये, सेयहामा गावात तिसरा सेंद्रीय किंग मिर्ची म्हणजे नागामिर्ची महोत्सव

नागालँडमध्ये, कोहिमा जिल्ह्यातील सेयहामा गावात काल तिसरा सेंद्रीय किंग मिर्ची म्हणजे नागामिर्ची महोत्सव आयोजित करण्यात आला. 2022 मध्ये सुरू झालेल्या या उत्सवाचा सेयहामा गावातील नागा मिर्ची उत्पादकांनाप्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. इतर राजा मिरचींपेक्षा ही मिर्ची अतिशय तिखट आणि चवीसाठी ओळखली जाते. 2008 मध्ये या मिर्चीला GI प्रमाणपत्र मिळालं आहे