September 20, 2024 7:31 PM

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स पहिल्यांदाच ८४ हजाराच्या वर बंद 

  मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज पहिल्यांदा ८४ हजार अंकांच्या महत्त्वपूर्ण पातळीच्या वर पहिल्यांदा बंद झाला. सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीनं विक्रमी पातळी गाठली. दोन्ही निर्देशांकांत सकाळपासून सुरू झालेली तेजी अखेरपर्यंत वाढत गेली.   दिवसअखेर सेन्सेक्स १ हजार ३६० अंकांची तेजी नोंदवून ८४ हजार ५४४ अंकांवर बंद झाला. निफ्टी ३७५ अंकांची वाढ नोंदवून २५ हजार ७९१ अंकांवर स्थिरावला. बँक निफ्टीनं यंदा ५४ हजार अंकांची पातळी पहिल्यांदाच ओलांडली. वाहन, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, औषध, धातू अश...

August 12, 2024 7:29 PM

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्समधे आज ५७ अंकांची घसरण

भारतीय शेअर बाजारातल्या सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये आज दिवसभर चढउतार पाहायला मिळाले. आज दिवस अखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५७ अंकांनी घसरून ७९ हजार ६४९ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी  २१ अंकांनी घसरून २४ हजार ३४७ अंकांवर बंद झाला. दरम्यान, आशिया खंडातल्या चार प्रमुख शेअर बाजारांमध्येही आज घसरण पाहायला मिळाली. दक्षिण कोरियाच्या कोस्पी या बाजाराचा निर्देशांक १ टक्क्याने, हाँगकाँगच्या हँग सेंगचा निर्देशांक आणि चीनचा शांघाय कंपोझिट निर्देशांक शून्य पूर्...