August 4, 2024 1:46 PM

मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातल्या घाट भागात अतिवृष्टीची शक्यता

भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातल्या घाट भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. तसंच पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नैऋत्य राजस्थान आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हा मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. या महिन्याच्या १० तारखेपर्यंत जम्मू-काश्मीर आणि पंजाब, तसंच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातह...

July 8, 2024 12:46 PM

पाण्याचा निचरा करण्यासाठी अतिरिक्त जलपंप उपलब्ध – मंत्री दीपक केसरकर

मुंबई शहरात सध्या फक्त कुर्ला आणि शीव या भागात पाणी साठलेलं असून  त्याचा निचरा करण्यासाठी अतिरिक्त पंप उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली. मुंबईतलं जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर, सध्या परिस्थिती काय आहे आणि ती पूर्ववत करण्यासाठी काय पावलं सरकार उचलत आहे, याबाबतचं निवेदन सरकारने करावं, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्यानंतर ते बोलत होते.    मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व श...