September 14, 2024 6:29 PM

मुंबई विमानतळावर गेल्या २ दिवसात साडेसात किलो सोनं जप्त

मुंबई विमानतळावरुन गेल्या दोन दिवसात तस्करी करुन आणलेलं साडेसात किलो सोनं जप्त करण्यात आलं असून त्याची बाजारातली किंमत ५ कोटी रुपयांहून अधिक असल्याची माहिती विमानतळ झोन ३ च्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. सोने तस्करीच्या एकूण ७ प्रकरणांमध्ये ही जप्ती करण्यात आली असून या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये विमानतळ प्राधिकरणाच्या काही कंत्राटी कामगारांचाही समावेश आहे. सोने तस्करी प्रकरणी ६ कंत्राटी कामगारांबरोबर दुबई आणि मादागास्करहून आलेल्या प्रवाशांचा समावेश आहे.

June 16, 2024 8:01 PM

मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची कारवाई

सीमाशुल्क विभागानं मुंबई विमानतळावर गेल्या तीन दिवसात अकरा जणांकडून एकूण दहा किलोहून अधिक सोने जप्त केलं. या सोन्याची एकूण किंमत ६ कोटी ७१ लाख एवढी आहे. मेणाच्या वस्तू, दागिन्यांचे साचे तसंच अंगावरुन अशा विविध मार्गाने या सोन्याची तस्करी होत होती.   १४ ते १६ जून या कालावधीत शारजा ते मुंबई, मुंबई ते काठमांडू, दुबई, अदिसअबाबा अशा अनेक ठिकाणांहून प्रवास करणाऱ्यांकडून या सोन्याची गैरमार्गाने वाहतूक केली जात होती.