September 11, 2024 9:07 AM

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी कुटुंब भेट अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी राज्यभरात लाभार्थी कुटुंब भेट अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता दररोज 15 कुटुंबांची भेट घेऊन त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही, हे तपासून पाहील आणि, हा लाभ मिळाला नसेल, तर संबंधित कुटुंबाला मार्गदर्शन करून अडचणी दूर करेल, असं शिंदे यांनी सांगितलं.

September 10, 2024 9:17 AM

राज्यात आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान

शासनाच्या १० महत्त्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी राज्यात आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १५ कुटुंबांची भेट घेऊन अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. काल मुंबईत पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी या अभियानाबाबत माहिती दिली. या अभियानात शिवसैनिक दररोज १५ कुटुंबाची भेट घेऊन ज्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचली नाही, त्यांना योजनेत सामावून घेण्याचे प्रयत्न केले जातील. मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाच्या ॲपचं आज लोकार्पण होण...

August 18, 2024 7:00 PM

लाडकी बहीण योजना थांबणार नसल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

महाराष्ट्रातल्या बहि‍णींना आता कुणापुढे हात पसरण्याची गरज उरणार नाही, कारण त्यांच्या तीन भावांनी त्यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज साताऱ्यात केलं. महिला सशक्तीकरण अभियानात ते बोलत होते. काही सावत्र भाऊ या योजनेला विरोध करत न्यायालयात गेले आहेत, त्यांना उत्तर द्या, असं आवाहन त्यांनी केलं.   ही योजना थांबणार नाही, आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही दिलेला हा माहेरचा आहेर आहे, आमचं सरकार हे आमच्या बहि‍णींसाठी हक्काचं माहेर आहे, असं शिंदे यां...

August 17, 2024 3:36 PM

लाडकी बहीण योजनेच्या निधी हस्तांतरणाला पुण्यात औपचारिक प्रारंभ

राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम आज पुण्यात बालेवाडी इथल्या श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, तसंच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अन्य मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राज्यातील 15 हजाराहून अधिक लाभार्थी प्रातिनिधिक स्वरुपात या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1 हजार 500 रुपयांचा लाभ देण्यात येत असून ...