September 26, 2024 6:49 PM

MPSCकडून राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२३ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२३ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. वैद्यकीय अहवाल विचारात घेऊन उमेदवारांना पदांचे पसंतीक्रम ऑनलाईन सादर करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करुन दिली जाईल, असं आयोगानं कळवलं आहे.  ही यादी विविध न्यायालयांमधे दाखल असलेल्या प्रकरणांवरच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून जाहीर केली असल्याचं आयोगानं स्पष्ट केलं आहे.

September 23, 2024 7:35 PM

MPSC च्या राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत राज्यशासनाच्या कृषि सेवेतल्या पदांचा समावेश

MPSC च्या राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत राज्यशासनाच्या कृषि सेवेतल्या पदांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आज नवी मुंबईत बेलापूर इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विविध संवर्गांच्या एकूण २७४ रिक्त पदांकरीता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ ची जाहिरात गेल्या डिसेंबरमधे प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर कृषी विभागतल्या २५८ पदांसाठीची मागणी आयोगाला मिळाली. शासनाच्या विनंतीनुसार या पदांचा समावेश  त्याच परीक्षेत करण्यात आला असून आता ...

August 22, 2024 1:18 PM

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलली

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. परीक्षेची नवी तारीख लवकराचं जाहीर करण्यात येईल असं आयोगानं समाज माध्यमावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

August 17, 2024 8:13 PM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दोन परिक्षांचं आयोजन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट-ब साठी संयुक्त चाळणी परीक्षेचं उद्या १८ ऑगस्टला तर, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ या परीक्षेचं आयोजन येत्या २५ तारखेला करण्यात आले आहे. याचवेळी IBPS ने देशपातळीवर परीक्षा आयोजित केल्या आहेत. त्यामुळं MPSC नं परीक्षाच्या तारखा बदलाव्या अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागू, असा इशारा काँग्रेसनं दिला आहे.

July 3, 2024 9:14 AM

‘एमपीएससी’ची महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा-२०२३ पुढे ढकलली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा-२०२३ लिपिक टंकलेखक आणि कर सहायक, या संवर्गाकरता घेण्यात येणारी, टंकलेखन कौशल्य चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा १ जुलै ते १३ जुलै दरम्यान घेण्यात येणार होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, सुधारित तारीख स्वतंत्रपणे घोषित करण्यात येईल, असं आयोगानं कळवलं आहे.