July 19, 2024 1:44 PM
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार सहा नवीन विधेयकं सादर करणार
पुढच्या आठवड्यात सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार नवीन सहा विधेयकं सादर करणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये काही सुधारणा सुचवणाऱ्या विधेयकासह अर्थविषयक विधेयकांचा यामध्ये समावेश आहे. विमान कायदा १९३४ ला पर्याय म्हणून वायुयान विधेयक २०२४ मांडण्यात येणार असून नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात व्यवसाय करणं सुलभ व्हावं यासाठी त्यात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. लोकसभा सचिवालयानं काल या आगामी विधेयकांची सूची जाहीर केली. येत्या २२ जुलै रोजी संसदेचं अधिवेशन सु...