August 5, 2024 9:59 AM

महाराष्ट्रात पुण्यासह अन्य भागात जोरदार पाऊस, पूरस्थितीमुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्रात काल पुण्यासह अन्य काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या काही भागाला काल पुन्हा जोरदार पावसानं झोडपून काढलं. खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात पावसाचा जोर कायम होता. धरणातून मुठा नदीमध्ये सकाळपासून टप्प्याटप्प्यानं पाण्याचा विसर्ग सुरू होता. सिंहगड रस्त्यावरील एकतानगर, निंबज नगरसह येरवड्यातील शांतीनगर, आदर्शनगर इथंही पाण्याची पातळी वाढल्यानं अग्निशमन दलानं या भागातील अनेक नागरिकांची सुखरूप सुटका केली. तसंच या परिसरात लष्कराची तुकडीही तैनात करण्यात आली होती. पुण्यात होत...

June 23, 2024 7:46 PM

येत्या २४ तासांत कोकण आणि विदर्भात पावसाची शक्यता

येत्या २४ तासांत कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे,   वाशिम शहर तसंच जिल्ह्यात गेल्या तासाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.   नाशिक जिल्ह्यात आज दिवसभर पावसानं चांगली हजेरी लावली. बऱ्याच दिवसां...

June 20, 2024 7:52 PM

नैर्ऋत्य मोसमी पाऊस विदर्भात दाखल, पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट

नैर्ऋत्य मोसमी पाऊस आज विदर्भात दाखल झाला असून पुढच्या दोन दिवसात उर्वरित राज्य व्यापण्याच्या दृष्टीनं स्थिती अनुकूल आहे. कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काल पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतेक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे. किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.   पुढच्या २४ तासांत पालघर जि...

June 19, 2024 7:20 PM

राज्यात मोसमी पावसासाठी अनुकूल परिस्थिती

नैऋत्य मोसमी पाऊस येत्या तीन-चार दिवसात राज्याच्या आणखी काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. गेल्या चोवीस तासात कोकणात मुसळधार पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.   येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.    येत्या २४ तासात मुंबई शहर आणि उपनगरांत आकाश ढगाळ राहील. परिसर...

June 13, 2024 7:52 PM

राज्यात मोसमी पावसासाठी अनुकूल परिस्थिती

नैऋत्य मोसमी पाऊस पुढच्या तीन चार दिवसात राज्याच्या आणखी काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.    येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.   गेल्या चोवीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडला.