August 24, 2024 8:10 PM

विधानसभा निवडणुकीत मनसे २५० जागा  लढवणार

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना २५० जागा  लढवणार असल्याचं पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. नागपुरातील रवि भवन इथं  आज, ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जनता आपल्यासोबत असून मनसेला निवडणुकीत चांगले यश मिळेल असा दावा ठाकरे यांनी केला. विधानसभा निवडणुकीसाठीची आपली धोरणं त्यांनी स्पष्ट केली. राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहिण योजना औटघटकेची ठरेल. राज्याच्या तिजोरीत पैसा नसल्याने ही योजना 2 महिन्यात गुंडाळली जाईल असं भाकित त्यांनी वर्तवलं.

July 25, 2024 3:24 PM

विधानसभा निवडणुकीत मनसे २२५ ते २५० जागा लढवणार – राज ठाकरे

आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना २२५ ते २५० जागा लढवणार असून त्यादृष्टीनं येत्या १ ऑगस्ट पासून राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत कार्यकर्ता मेळाव्यात दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर टीका केली.