September 21, 2024 7:15 PM

येत्या डिसेंबरपर्यंत पुण्यात दीड लाख कोटी रुपयांची कामं सुरू करणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

येत्या डिसेंबरपर्यंत पुण्यात दीड लाख कोटी रुपयांची कामं सुरू करणार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. ते आज पुण्यात संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावरच्या  दिवे घाट-हडपसर चौपदरीकरण तसंच वारजे-सिंहगड दरम्यान सेवा रस्ते आणि पुलांच्या बांधकामांचं भूमिपूजन केल्यावर बोलत होते. शेकडो वर्षांचा वारीचा इतिहास असलेल्या आळंदी-पंढरपूर आणि देहू-पंढरपूर या पालखी मार्गाची निर्मिती करण्याची संधी मिळाली, याचा आपल्याला अतिशय आनंद होत असल्याचं ते म्हणाले.  पुणे विमानतळाला...

September 19, 2024 8:12 PM

हायड्रोजन इंधनाचा वापर करुन इंधन आयातीची प्रमाण २२ लाख कोटी रुपयांवरुन ४ लाख कोटी रुपयांपर्यंत कमी करण्याचा सरकारचा मानस

हायड्रोजन इंधनाचा वापर करुन इंधन आयातीची प्रमाण २२ लाख कोटी रुपयांवरुन ४ लाख कोटी रुपयांपर्यंत कमी करण्याचा सरकारचा मानस असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज म्हणाले. यासाठी केंद्र सरकार मिराई प्रकल्प राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं. जैव तंत्रज्ञानाचा वापर करुन स्वस्त दरात हायड्रोजन उपलब्ध होऊ शकेल. १ डॉलर प्रति किलो दरानं हायड्रोजन निर्मितीचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.

September 11, 2024 12:15 PM

2030 पर्यंत देशात इलेक्ट्रिक वाहनांची वार्षिक विक्री एक कोटीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा – गडकरी

देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ होत असून 2030 पर्यंत वार्षिक विक्री एक कोटीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. भारतीय वाहन उत्पादक संघाच्या 64 व्या वार्षिक अधिवेशनाला संबोधित करताना ते काल नवी दिल्लीत बोलत होते. देशात जवळपास 30 लाख ईव्ही इलेक्ट्रिक नोंदणीकृत वाहनं असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी भारतीय वाहन उद्योग हा देशाच्या अर्थव्यवस्थेत 6 पूर्णांक 8 टक्के योगदानासह...

September 10, 2024 7:57 PM

विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ – मंत्री नितीन गडकरी

विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली असून २०३० पर्यंत हा खप वर्षाला एक कोटी पर्यंत पोहोचेल असं केंद्रीय रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.  ते आज सिएम या भारतीय वाहन उत्पादक संघटनेच्या ६४व्या संमेलनात बोलत होते. या उद्योगातून ५ कोटी रोजगार निर्मिती होईल असं ते म्हणाले. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच डी कुमारस्वामी या संमेलनाला उपस्थित होते.