September 25, 2024 3:16 PM

वक्फ सुधारणा विधेयकाचं पुनरावलोकन करण्यासाठीचा अहवाल हिवाळी अधिवेशनात सादर होणार

वक्फ सुधारणा विधेयकाचं पुनरावलोकन करण्यासाठी स्थापन झालेली संसदेची संयुक्त समिती आपला अहवाल हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सादर करेल, अशी अपेक्षा केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार मंत्री किरेन रिजुजु यांनी व्यक्त केली. समितीला एक कोटीपेक्षा जास्त निवेदनं प्राप्त झाली असंही रिजुजु यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला शंभर दिवस पूूर्ण झाल्याबद्दल रिजुजु दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. संयुक्त समिती विविध सरकारी आणि खासगी संस्थांकडून सूचना मागवत असून यावर व्यापक चर्चा सुरू असल्याचं ...

September 14, 2024 3:00 PM

वक्फ सुधारणा विधेयकाला मुस्लिम बांधवांचं समर्थन असल्याचं मंत्री किरेन रिजिजू यांचा दावा

वक्फ सुधारणा विधेयकाबद्दल कुणाच्याही मनात कोणताही संभ्रम असण्याची गरज नाही. काही लोक या विधेयकाला विरोध करत असले, तरी बहुतेक मुस्लिम बांधवांनी या विधेयकाला समर्थन दिलं आहे, असा दावा केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. मुंबईत पारसी समुदायाच्या कार्यक्रमानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. देशात सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मात्र या विधेयकाबद्दल खोट्या गोष्टी पसरवून कुणीही नागरिकांची दिशाभूल करू नये, असं आवाहन त्यांनी केलं.

September 14, 2024 3:59 PM

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाला सर्व प्रकारची मदत दिली जाईल – मंत्री किरेन रिजिजु

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाला सर्व प्रकारची मदत दिली जाईल, कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पारसी समुदायाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन, राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार आणि इतर यावेळी उपस्थित होते.   पारसी समाजाची घसरती लोकसंख्या हे या समुदायासमोरचं सर्वात मोठं आव्हान असून त्याचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार ‘जियो पारसी...

September 14, 2024 1:38 PM

बुद्ध धर्माला योग्य रीतीनं पुढे नेण्याचा सरकारचा प्रयत्न – किरेन रिजिजू

बुद्ध धर्माला योग्य रीतीनं पुढे नेण्याचा प्रयत्न केंद्र सरकारनं केला आहे, असं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सांगितलं. ते आज मुंबईत ‘भगवान बुद्ध यांच्या मध्यम मार्गाद्वारे भविष्यातील जागतिक नेतृत्वासाठी मार्गदर्शन’ या विषयावर आयोजित एक दिवसीय संमेलनात बोलत होते.   भगवान बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चाललं तर जगाचं नेतृत्व करणं सोपं होईल, आजकाल निव्वळ मतं मिळवण्यासाठी राजकारण केलं जातं , मात्र हे चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बुद्धाची शि...

August 11, 2024 1:33 PM

वक्फ सुधारणा विधेयक २०२४चा आढावा घेण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना

वक्फ दुरुस्ती विधेयक, २०२४ चं पुनरावलोकन करण्यासाठी स्थापन केलेली ‘जेपीसी’ अर्थात, संयुक्त संसदीय समिती, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी लोकसभेला आपला अहवाल सादर करेल, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी काल सोशल मीडियावरील संभाषणादरम्यान, दिली. या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख ही संसदीय समिती जाहीर करेल, मुस्लिमांसह,  सकारात्मक योगदान देऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही संस्था किंवा व्यक्तींला या समितीच्या कामकाज प्रक्रियेत सहभागी होता येईल, असं त्यांनी ...