September 17, 2024 6:41 PM

गेल्या ९ वर्षात देशातल्या दूधउत्पादनात ५७ टक्क्यापेक्षा जास्त वाढ

गेल्या ९ वर्षात देशातल्या दूधउत्पादनात ५७ टक्क्यापेक्षा जास्त वाढ झाली असल्याचं, केंद्रीय मत्सोउद्योग, पशुपालन आणि दुग्धउत्पादन मंत्री राजीव रंजन सिंग यांनी सांगितलं. मत्सउत्पादनातही चांगली वाढ झाली असून त्याबाबत भारत दुसऱ्या स्थानावर आहे, असं ते म्हणाले. २०१३-१४ मधे देशातलं मत्सउत्पादन ९५ लाख टनापेक्षा जास्त होतं. ते २०२२-२३ मधे १ कोटी ७५ लाख टनाच्या वर गेलं. ही वाढ ८३ टक्के आहे, असं त्यांनी सांगितलं.

July 17, 2024 3:51 PM

दूध प्रक्रिया केंद्रांनी २० लाख लिटर दूधाचं संकलन करावं – मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील

राज्‍यातला अतिरिक्‍त दूधाचा प्रश्‍न सोडवण्‍यासाठी अमूल उद्योग समुह तसंच इतर प्रक्रिया केंद्रानी अतिरिक्‍त २० लाख लिटर दूधाचं संकलन करावं असं आवाहन, दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केलं आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात दूध व्‍यवसायिक आणि सर्व प्रक्रीया केंद्राच्‍या प्रमुखांच्‍या बैठकीत ते बोलत होते. या प्रक्रीया केंद्रानी सहकार्य केलं तर राज्‍यातल्या दूध उत्‍पादकांना ३५ रुपये भाव देणं शक्‍य होईल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.