June 18, 2024 1:04 PM

‘मिफ’ महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी लघुपट, माहितीपटांचे प्रदर्शन

१८व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आजचा तिसरा दिवस अनेक चित्रपट, माहितीपट, लघुपटांच्या प्रदर्शनांनी उत्साहात पार पडला. मिफमध्ये आज प्रतिष्ठेच्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी गेल्या काही वर्षांत निवडल्या गेलेल्या काही निवडक चित्रपटांसोबत रशिया, इराण, इटली इत्यादी देशांचे, तसंच भारतीय लघुपट, माहितीपट आणि ऍनिमेशनपट, ऑस्करसाठी निवडलेले लघुपट दाखवले आहेत.     याअंतर्गत, २०२०मध्ये बर्लिन चित्रपट महोत्सवात दाखवलेल्या ‘गुमनाम दिन’ हा लघुपटाच्या दिग्दर्शक एकता मित्तल या...

June 17, 2024 3:53 PM

मिफ महोत्सवात ‘सामाजिक परिवर्तन करण्याची माहितीपटांची क्षमता’ या विषयावर चर्चासत्र

मुंबईत सुरु असलेल्या १८ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज ‘सामाजिक परिवर्तन करण्याची माहितीपटांची क्षमता’ या विषयावर चर्चासत्र झालं. दिग्दर्शक टी. एस. नागभरण यांची मुलाखत डी. रामकृष्णन यांनी घेतली.   याशिवाय ‘माहितीपटांमधलं निर्मितीमधून महिलांचं भावविश्व’ या विषयावरही चर्चा सत्र झालं. याशिवाय विविध माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशनपट आज दाखवले जाणार आहेत.   

June 16, 2024 9:02 PM

१८व्या ‘मिफ’ महोत्सवाचा दुसरा दिवस उत्साहात पार

  १८व्या 'मिफ' अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस भरगच्च कार्यक्रम आणि उपक्रमांसह पार पडला. माहितीपट क्षेत्रातल्या नवोदितांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने यावर्षी पहिल्यांदाच आयोजित केलेल्या 'माहितीपट बझार'चं उद्घाटन 'दिल्ली क्राइम' या गाजलेल्या वेबसीरिजच्या निर्मात्या अपूर्वा बक्षी यांच्या हस्ते, महोत्सवाचे संचालक पृथुल कुमार आणि पत्रसूचना कार्यालयाच्या अतिरिक्त महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांच्या उपस्थितीत झालं.     विविध देशांचे, भाषांचे आणि विषयांवर...

June 15, 2024 7:01 PM

१८व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन

१८व्या 'मिफ' अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिला जाणारा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार विख्यात वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बय्या नल्लमुत्थू यांना दिला जाणार असल्याची घोषणा माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज केली. चित्रपटांमुळे मनोरंजन तर होतंच, शिवाय आर्थिक वाढीला चालना मिळते आणि रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतात, असं ते म्हणाले. भारतीय चित्रपटक्षेत्राच्या वाढीसाठी सरकार वचनबद्ध आहे. माहितीपट, लघुपट, ॲनिमेशनपट निर्मात्यांनी भारतात येऊन चित्रीकरण करावं, असं आवाह...

June 14, 2024 11:47 AM

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा २१ मराठी चित्रपट,लघुपट आणि माहितीपटांचा समावेश

मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा २१ मराठी चित्रपट, लघुपट आणि माहितीपटांचा समावेश आहे. उद्यापासून हा महोत्सव सुरु होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सार्वनिक कौर यांचा अगेन्स्ट द टाइड हा चित्रपट आहे. तर राष्ट्रीय स्पर्धेत बिगारी कामगार, भैरवी, भगवान, गुंतता हृदय हे, वूमन ऑफ बिलियन, फेरा, आजोबांचं घर, वैद्यराज, अद्वैताच्या पाऊलखुणा, सहस्त्रसूर्य सावरकर, डोमकावळा - द रावन, भेड चाल, म्हातारा डोंगर या लघुपट- माहितीपटांचा समावेश आहे.