August 29, 2024 8:02 PM

देशभरात महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचाराच्या घटना चिंताजनक – बसपा अध्यक्ष मायावती

देशभरात महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचाराच्या घटना चिंताजनक आहेत, या प्रकरणात सर्व राजकीय पक्षांनी राजकारण न करता योग्य ती कठोर पावलं उचलावीत, असं बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष  मायावती यांनी म्हटलं आहे. देशात विविध ठिकाणी निष्पाप अल्पवयीन मुलींवर आणि महिलांविरोधात बलात्कार, हत्या आणि अत्याचाराच्या झालेल्या विविध घटनांबद्दल त्यांनी समाज माध्यमावरून नाराजी व्यक्त केली. 

July 7, 2024 8:29 PM

के. आर्मस्ट्राँग यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्याची बसपा पक्षप्रमुख मायावती यांची मागणी

बहुजन समाज पार्टीचे तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष के. आर्मस्ट्राँग यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी केली आहे. चेन्नई इथं आर्मस्ट्राँग यांच्या पार्थिवाला पुष्पांजली वाहिल्यानंतर त्या बातमीदारांशी बोलत होत्या. राज्यातल्या दुर्बल घटकांचं रक्षण करण्याचं आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन त्यांनी राज्य सरकारला केलं. दरम्यान, आर्मस्ट्राँग यांचं दफन पक्ष कार्यालयात करण्याची मागणी न्यायलयानं अमान्य करत राज्य सरकारने देऊ केलेल्या जागेत दफनविधी करावा असं सुचवलं.