July 18, 2024 3:40 PM

मॉरिशसमध्ये भारताच्या पहिल्या परदेशस्थ जनऔषधी केंद्राचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांनी केले उद्घाटन

भारताच्या पहिल्या परदेशस्थ जनऔषधी केंद्राचं उद्घाटन परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांनी काल मॉरिशस इथं केलं. यावेळी मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद कुमार जगनॉथ उपस्थित होते. भारत आणि मॉरिशस यांच्या दरम्यानच्या आरोग्य भागीदारी उपक्रमा अंतर्गत भारतात उत्पादन झालेल्या आणि स्वस्त औषधांचा पुरवठा मॉरिशस मध्ये केला जाईल, अशी ग्वाही जयशंकर यांनी यावेळी केली. त्याआधी जयशंकर यांनी मॉरिशसच्या ग्रँड बोआ परिसरात भारताच्या आर्थिक मदतीच्या आधारे उभ्या केलेल्या मेडिक्लिनिक उपक्रमाचं उद्घाटन केलं.  

July 16, 2024 7:44 PM

परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद कुमार जुगनाथ यांची घेतली भेट

परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज पोर्ट लुईस येथे मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद कुमार जुगनाथ यांची भेट घेतली. जयशंकर यांनी भारत-मॉरिशस विशेष आणि कायमस्वरुपी भागीदारी बद्दल चर्चा केली आणि त्याच्या अधिक विस्ताराचं कौतुक केलं. अंतराळ सहकार्य, राष्ट्रीय अभ्यासक्रम संशोधन संस्थेचा विकास, आदी क्षेत्रात झालेल्या करारांचा त्यांनी आढावा घेतला. मॉरिशियस मध्ये राहणाऱ्या सातव्या पिढीतल्या नागरिकांना जयशंकर यांनी परदेशी भारतीय नागरिकत्त्वाच्या कार्डचं वाटप केलं.

July 16, 2024 1:42 PM

परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आजपासून दोन दिवसीय मॉरिशस दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर हे आजपासून दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर आहेत. भारत आणि मॉरिशस या देशांच्या परस्पर संबधांत वाढ व्हावी यासाठी हा दौरा असल्याचं डॉ. जयशंकर यांनी त्यांच्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या दौऱ्यात डॉ. जयशंकर मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद जुगनाथ यांची भेट घेणार असून मॉरिशसच्या इतर वरिष्ठ नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकही घेणार आहेत.