September 5, 2024 7:00 PM

मराठवाडा रेल्वे डबे निर्मिती कारखाना कार्यान्वित

भारतीय रेल्वेला अधिक सक्षम करण्याच्या दिशेनं आणखी एक पाऊल म्हणून लातूर मधला मराठवाडा रेल्वे डबे निर्मिती कारखाना आता कार्यान्वित झाला आहे. भारतीय रेल्वेचा कायापालट करण्याच्या रेल्वे विकास मंडळाच्या वचनबद्धतेचं हे द्योतक आहे. या कारखान्याला वंदे भारत रेल्वे गाड्यांचे शयनयान व्यवस्था असलेले १ हजार ९२० डबे बनवण्याचं आणि पुढील ३५ वर्ष त्यांच्या देखभालीचं काम सोपवण्यात  आलं आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार आणि कौशल्यवृद्धी होऊन २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्याचं स्वप्न साकारण्यात मोठा हातभा...

September 3, 2024 10:21 AM

मराठवाड्यात २८४ मंडळात अतिवृष्टी

मराठवाड्यात सर्वत्र जोरदार पाऊस कायम असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. विभागातल्या २८४ मंडळात अतिवृष्टी झाली असून, ६३ गावांना फटका बसला आहे. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होत आहे. दरम्यान, मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला असून, नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यानं, अनेक रस्त्यांवरचे पूल पाण्याखाली गेले, काही गा...

August 21, 2024 8:56 AM

मराठवाड्यात गेल्या दोन दिवसात जोरदार पाऊस

मराठवाड्यात गेल्या दोन दिवसात सात जिल्ह्यातल्या २२ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. आतापर्यंत विभागात ७३ पूर्णांक पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात काल चांगला पाऊस झाला. दुपारी काही वेळ मुसळधार पाऊस झाल्यानंतर रात्रभर पावसाची संततधार सुरु होती. जिल्ह्यातल्या तुर्काबाद, चिकलठाण्यासह जालना, बीड, धाराशिव, नांदेड जिल्ह्यातल्या अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला.   दरम्यान, येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठ...

August 17, 2024 3:56 PM

मराठवााड्यात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

मराठवााड्यात काल अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला.   बीड जिल्ह्यातल्या पाटोदा महसूल मंडळात काल मध्यरात्री पासून मुसळधार पाऊस पडत असून मांजरा नदीला महापूर आला आहे. पाटोदा, पारगाव, अनपटवाडी या नदीकाठच्या गावांना महापुराचा मोठा फटका बसला असून शेकडो एकर जमिनीवरची पिकं पाण्याखाली गेली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.   हिंगोली जिल्ह्यातल्या तीसपैकी नऊ मंडळात गेल्या २४ तासात अतिवृष्टीची नोंद झाली असून, काल पहाटे मेघगर्जनेसह झालेल्या जोरदार पावसामुळं हिंगोली शहरालगत असलेल्या कया...

July 30, 2024 7:44 PM

मराठवाड्यात खालसा झालेल्या देवस्थानच्या जमिनी मूळ मालकाला मिळणार

मराठवाड्यातल्या खालसा झालेल्या देवस्थानच्या जमिनी वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये आणण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळे या जमिनी मूळ मालकाला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिले आहेत. मराठवाड्यात १३ हजार हेक्टरपेक्षा जास्त मदतमाश जमिनी अर्थात उपजिविकेसाठी प्रदान केलेल्या जमिनी आहेत. तर ४२ हेक्टरपेक्षा जास्त खिदमतपाश अर्थात सेवाधारी इनाम जमिनी आहेत.

July 10, 2024 1:49 PM

मराठवाडा आणि विदर्भात पहाटे भूकंपाचे धक्के

महाराष्ट्रातल्या मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांना आज सकाळी ७ वाजून १६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाची तीव्रता साडेचार रिक्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातल्या रामेश्वर तांडा गावात होता. भूकंपामुळे कोणतीही जिवीत अथवा वित्त हानी झालेली नाही. मराठवाड्यातल्या नांदेड, परभणी आणि हिंगोली तर विदर्भातल्या वाशिम इथंही भूकंपाचे धक्के जाणवले. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं ...