September 17, 2024 9:59 AM

हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज राज्यात, प्रामुख्यानं मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण होणार आहे. नांदेडमधे पालकमंत्री गिरीश महाजन, हिंगोलीत पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण होणार आहे. नांदेडमध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे; तर हिंगोलीतही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा सत्कार ह...

September 13, 2024 10:55 AM

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त १७ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. यासंदर्भात काल छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह अनेक अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बायोमेडिकल वेस्ट प्रकल्पाचं भूमिपूजन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानातल्या तारांगणाचं उद्घाटन, विविध रस्ते तसंच विकेंद्रित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचं ई भूमिपूजन होणार...