September 26, 2024 9:50 AM

आरक्षणाच्या मागणीसाठीचं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित, ओबीसी उपोषणकर्त्यांचंही उपोषण मागे

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांनी काल उपोषण स्थगित केलं. आता उपोषण करून नाही तर सत्तेत बसून आरक्षण मिळवू, असं जरांगे यांनी यावेळी म्हटल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात डोंगरगाव पूल इथं नागरिकांनी काल कयाधू नदीपात्रात उतरून आंदोलन केलं. दरम्यान, ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं देखील आमरण उपोषण ...

September 22, 2024 9:50 AM

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी घनसावंगी तालुक्यात रास्तारोको आंदोलन, बीड आणि धाराशिव जिल्हा बंदला सर्वत्र प्रतिसाद

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचं जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी काल घनसावंगी तालुक्यात तीर्थपुरी, बानेगाव, भोगगाव, रामसगाव इथं मराठा समाज बांधवांनी रास्तारोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे तीर्थपुरी मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलकांनी पुकारलेल्या बीड आणि धाराशिव जिल्हा बंदला काल सर्वत्र प्रतिसाद मिळाला. तर लातूर जिल्ह्यातल्या सकल मराठा समाज...

September 1, 2024 7:23 PM

शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचं राजकारण करणं दुर्दैवी – मनोज जरांगे

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचं राजकारण होत असून हा प्रकार महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे. अशा घटनेचं राजकारण करणाऱ्यांना राज्याची जनता घरी बसवेल, असं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आज राजकोट इथे म्हणाले. जरांगे यांनी दुर्घटनाग्रस्त पुतळ्याची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. वाढवण बंदराबाबत आपण माहिती घेत असून सरकारने स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही जरांगे यांनी यावेळी केली.

July 25, 2024 3:14 PM

मराठा आरक्षण दिल्याचा विसर पडल्याची शेलारांची जरागेंवर टीका

मराठा समाजाचं आरक्षण ज्यांच्यामुळे रद्द झालं, त्यांच्या विरोधात मनोज जरांगे बोलत नसून ज्यांनी दिलं त्यांच्या विरोधात बोलतात, अशी टीका भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केली. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षानं आरक्षण दिलं, याचा जरांगे यांना विसर पडल्याची टीकाही शेलार यांनी केली.

July 20, 2024 7:34 PM

मनोज जरांगे यांचं पुन्हा आमरण उपोषण सुरू

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी या गावात पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे. उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सगेसोयरेंची अंमलबजावणी करावी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे, तसंच तीनही गॅझेट लागू करावे या मागणीचा त्यांनी पुनरुउच्चार केला. सरकारनं आपल्या मागण्या मान्य न केल्यानं पुन्हा उपोषण करण्याची वेळ आल्याचं जरांगे पाटील म्हणाले. सरकारच्या लाडका भाऊ, लाडकी बहीण या योजनांवरही जरांगे यांनी टीका केली. सध्...