August 29, 2024 7:24 PM

मनोज जरांगे यांचा २९ सप्टेंबरपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी २९ सप्टेंबरपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार आज आंतरवाली सराटी इथं जाहीर केला. गेल्या वर्षी २९ ऑगस्ट याच दिवशी जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटीमधून त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं.   या आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त त्यांनी आज आंदोलक समन्वयकांची आंतरवाली इथं बैठक बोलावली होती. त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हे उपोषण सुरूच राहील असं ते म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जरांगे यांनी टीका केली.

July 30, 2024 7:57 PM

मनोज जरांगे यांनी विधानसभेच्या २८८ जागा लढवाव्यात – प्रकाश आंबेडकर

मराठा समाजातल्या गरीबांसाठी मनोज जरांगे यांनी विधानसभेच्या २८८ जागा लढवाव्यात, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. वंचित बहुजन आघाडीनं लातूर इथं काढलेल्या आरक्षण बचाव यात्रेत ते बोलत होते. मराठा समाजात श्रीमंत आणि गरीब असे दोन गट आहेत. त्यामुळे जरांगे यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरून सर्व जागा लढवाव्यात असं ते म्हणाले.

July 20, 2024 12:15 PM

मनोज जरांगे पाटलांचे आजपासून पुन्हा आमरण उपोषण

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. यापूर्वीच्या उपोषणावेळी सरकारच्या शिष्टमंडळानं दिलेलं कुठलंही आश्वासन पाळलं नाही, त्यामुळे पुन्हा उपोषणाचा निर्णय घेतल्याचं, त्यांनी सांगितलं.

June 13, 2024 7:28 PM

मनोज जरांगेंच उपोषण स्थगित

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आंतरवली सराटी इथं सुरू असलेलं आपलं उपोषण स्थगित केलं आहे. मंत्री शंभुराज देसाई, संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे.   सरकार सग्या सोयऱ्यांच्या कायद्याबद्दल सकारात्मक असून यावर एका महिन्यात निर्णय घेण्यात येईल, असं शंभुराज देसाई यांनी उपस्थित आंदोलकांना सांगितलं. तर सरकार १३ जुलैपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण करेल, अशी अपेक्षा मनोज जरांगे यांनी व्यक्त केली आहे.