July 28, 2024 7:21 PM
‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं ‘मन की बात’ मधून आवाहन
येत्या १५ ऑगस्ट निमित्त हर घर तिरंगा अभियानात सहभागी होत संकेतस्थळावर तिरंग्यासोबतचा फोटो अपलोड करावा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा एकशे बारावा भाग होता. हर घर तिरंगा हे अभियान तिरंग्याचा गौरव करणारा उत्सवच झाला असल्याचं ते म्हणाले. स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या भाषणासाठी दरवर्षीप्रमाणेच यंदाही नागरिकांनी MyGov किंवा NaMo App वर सूचना पाठवण्याचं आव...