July 25, 2024 7:36 PM

‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे दरवर्षी १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार’

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे दरवर्षी १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार असून कुशल आणि रोजगारक्षम महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या योजनेची मदत होईल, असं कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटलं आहे. सह्याद्री अतिथीगृहात 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी' आयोजित 'उद्योजकांशी संवाद' या बैठकीत मंगल प्रभात लोढा बोलत होते.   राज्यातल्या ४० उद्योजक आणि २० उद्योग क्षेत्रातल्या विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

July 19, 2024 7:25 PM

मुंबई उपनगरातल्या विकासकामांसाठी १ हजार ८८ कोटी रुपयांची तरतूद – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या विकासकामांसाठी १ हजार ८८ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली. या निधीपैकी एक हजार १२ कोटी जिल्हा वार्षिक योजनेसाठी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ७१ कोटी आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरच्या योजनेसाठी ५ कोटी ७१ लाख निधी देण्यात येणार आहे, असं लोढा यांनी सांगितलं. या बैठकीला खासदार संजय दिना पाटील, आमदार प्रवीण दरेकर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी उपस्...