August 5, 2024 9:59 AM

महाराष्ट्रात पुण्यासह अन्य भागात जोरदार पाऊस, पूरस्थितीमुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्रात काल पुण्यासह अन्य काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या काही भागाला काल पुन्हा जोरदार पावसानं झोडपून काढलं. खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात पावसाचा जोर कायम होता. धरणातून मुठा नदीमध्ये सकाळपासून टप्प्याटप्प्यानं पाण्याचा विसर्ग सुरू होता. सिंहगड रस्त्यावरील एकतानगर, निंबज नगरसह येरवड्यातील शांतीनगर, आदर्शनगर इथंही पाण्याची पातळी वाढल्यानं अग्निशमन दलानं या भागातील अनेक नागरिकांची सुखरूप सुटका केली. तसंच या परिसरात लष्कराची तुकडीही तैनात करण्यात आली होती. पुण्यात होत...

August 2, 2024 8:22 PM

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्हा नामांतर प्रकरणातील हस्तक्षेपाला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या जिल्ह्यांच्या नामांतराला आव्हान देणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्यानं राज्य सरकारला दिलेला आहे असं मत नोंदवत सर्वोच्च न्यायालयानं नामांतर प्रकरणात हस्तक्षेप करायला नकार दिला. जिल्ह्याचं नाव बदलायचं असेल, तर सूचना आणि हरकती मागवल्या जातात. मात्र औरंगाबाद नामांतराच्या वेळी असं घडलं नसल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला होता. मात्र, या प्रकरणी न्यायालयीन पुनरावलोकन करण्याची गरज नसल्याचं सांगून सर्वोच्च न्यायालय...

August 2, 2024 6:37 PM

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी मराठी भाषेतले अर्ज ग्राह्य धरले जातील’

'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी मराठी भाषेत केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील, असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज स्पष्ट केलं. या योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत असून अर्जाच्या प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे मराठी भाषेतल्या अर्जांचा विषय चर्चेला आला होता. परंतु ही अडचण संबंधित बँकेनं सोडवली असून मराठीत केलेले अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत. हे अर्ज इंग्रजीत पुन्हा भरावे लागतील असा अपप्रचार केला जात आहे, त्याची गरज नाही, असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं.

August 2, 2024 2:31 PM

मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांसाठीची परवानगी पत्रे ६ ऑगस्टपासून दिली जाणार

मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांसाठीची परवानगी पत्रे ६ ऑगस्टपासून दिली जाणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली असून गणेश मंडळे महानगनपालिकेच्या यासाठी तयार करण्यात आलेल्या पोर्टवर जाऊन त्याची प्रक्रिया पूर्ण करु शकतील. ज्या मंडळांनी गेल्या दहा वर्षात परवानगीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. त्यांना पुढील ५ वर्षांसाठी परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेनं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिली आहे. त्यांना दरवर्षी त्यांच्या पर...

August 2, 2024 10:23 AM

प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत राज्यात १ कोटी ६५ लाख ७० हजार ४३७ पीकविमा अर्ज दाखल

प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत राज्यात १ कोटी ६५ लाख ७० हजार ४३७ पीकविमा अर्ज दाखल झाल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. दरम्यान, राज्यात जुलै अखेर सुमारे ९७ टक्के पेरणी पूर्ण झाली असून पीकविमा योजनेच्या माध्यमातून १ कोटी १० लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आलं आहे.

July 31, 2024 8:19 PM

राज्यातल्या साखर कारखान्यांसाठी केंद्र सरकारकडून १,९०० कोटी रुपये मंजूर

राज्यातल्या साखर कारखान्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास महामंडळानं १ हजार ९०० कोटी रुपये मंजूर केले आहे. राज्यातल्या १३ सहकारी साखर कारखान्यांना त्याला लाभ होणार आहे. त्यातले सुमारे सोळाशे कोटी महामंडळानं आज राज्य सरकारला हस्तांतरित केले.

July 31, 2024 7:25 PM

राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ

राज्यात विविध ठिकाणी नद्यांच्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणांमधे पाणीसाठा वाढला आहे. अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोट परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असून धरण ९० टक्के भरलं आहे. धरणाच्या सांडव्यातून ६०९ क्युसेक विसर्ग प्रवरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे भंडारदरा धरण ते निळवंडे जलाशयापर्यंत प्रवरा नदीकाठच्या रहिवाशांनी काळजी घ्यावी असं आवाहन पाटबंधारे विभागाने केलं आहे.   सांगली जिल्ह्यातल्या वारणा धरणात आज सकाळी ८ वाजेपर्यंत २९ टी.एम.सी.पेक्षा जास्त पाणीसा...

July 31, 2024 8:40 PM

जपानने राज्यात उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक वाढवावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य असून अनेक जपानी कंपन्या राज्यात चांगलं काम करत आहेत. जपानने भविष्यात देखील राज्यात उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक वाढवावी, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.   जपानचे नवनियुक्त कॉन्सुलेट जनरल यागी कोजी यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. भारत आणि जपान हे आशिया खंडातले महत्वाचे देश असून दोन्ही देशांचे संबंध खूप जुने असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. जपानी कंपन्यांनी मुंबईच्या प...

July 31, 2024 6:48 PM

राज्यात एमआयडीसी उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

गडचिरोली जिल्ह्यातलं देसाईगंज, अहमदनगर जिल्यातलं लिंगदेव, नाशिक जिल्ह्यातलं कळवण-सुरगणा, जांबुटके आणि अमरावती जिल्ह्यातलं वरुड इथं एमआयडीसी उभारण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तसंच राज्यात यापुढे एमआयडीसी उभारण्यासाठी किमान शंभर एकर जमीनीची उपलब्धता करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातल्या त्यांच्या समिती कक्षात आज एमआयडीसी आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.    राज्याच्या ...

July 30, 2024 7:28 PM

महिलांसाठी खुशखबर ! तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत

सरकारनं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला असून आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये आर्थिक सहाय्यासोबतच वर्षभरासाठी तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागा अंतर्गत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणं आवश्यक आहे.