August 15, 2024 4:07 PM

राज्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

राज्यात सर्वत्र स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करण्यात येत आहे.   राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी पुण्यातल्या राजभवनात राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. राज्यपालांनी उपस्थित लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.         मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. राज्य शासन राज्याचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ ...

August 13, 2024 8:15 PM

मराठवाड्यातल्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मराठवाड्यातल्या खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने  आज घेतला आहे. त्यामुळे या जमिनी ताब्यात असणाऱ्यांच्या मालकीच्या होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बेठकीत हा निर्णय घेण्यात आला. वर्ग दोन च्या जमिनी वर्ग एक करण्याची ही मागणी साठ वर्षांपासून केली जात होती.  या जमिनी धार्मिक संस्थांसाठी किंवा इनाम म्हणून दिल्या गेल्या होत्या.  पशुपालन आणि दुग्धव्यवसाय विकासाला चालना देण्यासाठी विदर्भ आणि मर...

August 12, 2024 3:18 PM

आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यापेक्षा जास्त वाढवण्यासाठी पाठिंबा – शरद पवार

महाराष्ट्रात आरक्षणासंबंधाने दोन समाजात कटुता निर्माण होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून यावर तोडगा काढावा असं राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातलं सामाजिक वातावरण व्यवस्थित ठेवण्याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी असं आपल्याला वाटतं, यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना सर्वपक्षीय बैठक बोलावून तोडगा काढण्याविषयी सुचवलं, असं पवार म्हणाले...

August 9, 2024 7:16 PM

कांदा निर्यात बंदीचा निर्णय चुकीचा होता आणि त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला – उपमुख्यमंत्री अजित पवार

कांदा निर्यातीवर बंदी घातल्यामुळे शेतकरी नाराज झाले, याचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला. त्यामुळे कांदा निर्यातीवर बंदी लादण्याचा सरकारचा निर्णय चुकीचा होता, अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलेल्या जनसन्मान यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव इथं आयोजित लाडकी बहीण संवाद मेळाव्यात ते बोलत होते. सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन महिला सक्षम व्हाव्यात हा सरकारचा प्रयत्न असल्याचं अजित पवा...

August 9, 2024 3:38 PM

राज्यात नागपंचमीचा सण उत्साहात साजरा

राज्यात अनेक ठिकाणी आज नागपंचमीचा सण उत्साहात साजरा होत आहे. या दिवशी वारुळाची देखील पूजा केली जाते. सापांविषयी समाजामध्ये पसरलेल्या विविध गैरसमजांबाबत, अनेक सर्पमित्र नागपंचमीच्या निमित्तानं जनजागृती करत असतात. नागपंचमी निमित्त धुळे जिल्ह्यातल्या निमगुळ इथं आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सापासंदर्भात भित्तीचित्रकाद्वारे जनजागृती करण्यात आली. नागपंचमीसाठी प्रसिद्ध असलेल्या सांगलीतल्या बत्तीसशिराळ्यात प्रतिकात्मक पद्धतीनं नागपंचमी साजरी होत आहे.

August 7, 2024 6:59 PM

राज्य परिवहन महामंडळ कामगार संघटनाच्या कृती समितीची बैठक

राज्य परिवहन महामंडळ कामगार संघटनाच्या कृती समितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झाली. समितीच्या मागण्यांच्या अनुषंगाने बैठक घेऊन उच्चाधिकार समितीने याचा अहवाल आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. महामंडळाचं उत्पन्न वाढावं यासाठी दोन हजार नवीन बसगाड्या घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचंही त्यांनी सांगितलं.    महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावं, मागच्या वेतन वाढीतला फरक दूर करावा, महागाई भत्त्याच...

August 7, 2024 8:34 PM

वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

राज्यातल्या अल्पसंख्यंकांच्या उन्नती करता टार्टी, बार्टी, महाज्योतीच्या धरतीवर मार्टी अर्थात अल्पसंख्यांक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. या संस्थेसाठी एकूण ११ पदं निर्माण केली जातील. तसंच प्रशासनिक खर्चासाठी ६ कोटी २५ लाख रुपये खर्चासाठी मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे. राज्यात पावणेचार लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली  यात शेतकरी आत्महत्त्याग्रस्त जिल्ह्यांचा प्रामुख्यानं समावेश करण्यात आला आहे. तसंच वैनगंगा आणि नळगं...

August 5, 2024 7:16 PM

देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपला महाराष्ट्र देणार – मंत्री चंद्रकांत पाटील

येणाऱ्या काळात देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपला महाराष्ट्र देणार आहे. त्यामुळे उत्तमोत्तम कौशल्य असलेली पिढी घडविण्यासाठी शिक्षणावर जास्त खर्च करायचा आहे, असं प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगावमधल्या अंमळनेर इथं केलं. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्राचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

August 5, 2024 7:47 PM

जोरदार पावसामुळे पाणीपातळी वाढल्यानं अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला असून अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.   गेल्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.   पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल...

August 5, 2024 7:23 PM

पुण्यात झिका विषाणूचे आणखी ७ नवे रुग्ण

पुण्यात झिका विषाणूचे आणखी सात नवे रुग्ण आढळले आहेत. या सात नवीन रुग्णांमध्ये कात्रज आणि कोंढवा भागातल्या पाच गर्भवती महिला, एक १८ वर्षीय तरुण आणि एक ४० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ७२ जणांना झिका विषाणूची लागण झाल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य विभागानं दिला आहे.