September 11, 2024 2:29 PM

महाराष्ट्रात विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्रात विदर्भात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि वीजांसह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.     छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे आणखी सहा दरवाजे आज दुपारी उघडण्यात आले. आता धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उचलून सुमारे साडे नऊ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.   गोंदिया जिल्ह्यात काल रात्री ढगफुटी सारखा पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे....

September 8, 2024 7:07 PM

राज्यात सोयाबीन, उडीद पिकांसाठी किमान हमीभावानं खरेदी केंद्रं सुरू करायला केंद्र सरकारची मान्यता

महाराष्ट्रासह कर्नाटकात ९० दिवसांसाठी किमान हमीभावानं सोयाबीन आणि उडीद या दोन पिकांसाठी खरेदी केंद्रं सुरू करायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे. या निर्णयाबद्दल कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

September 8, 2024 11:59 AM

राज्यातल्या दहा जिल्ह्यात पिकांचं नुकसान, आठ लाख हेक्टरवरील पिकं बाधित झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल

कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार राज्यातील दहा जिल्हयांत पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. यामध्ये खरिपातील सुमारे आठ लाख 48 हेक्टर क्षेत्रावरील पिकं बाधित झाली असून, नुकसानाचे पंचनामे सुरू असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. कृषी विभागाच्या 24ऑगस्टपासून आतापर्यंतच्या अहवालानुसार खरीप हंगामातील पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, उडीद, मका, ज्वारी पिकांचं आणि कांदा, भाजीपाल्याचंही नुकसान झालं आहे. अतिपावसामुळं पिकांचं नुकसान झालं असेल तर शेतक-यांनी पीक विमा...

September 6, 2024 6:40 PM

परदेशी गुंतवणूकीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्र देशात अव्वल

परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात गेली दोन वर्ष सातत्यानं देशात अव्वल स्थानी  असलेल्या महाराष्ट्रानं  चालू  आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतही हे स्थान टिकवून ठेवलं आहे.  एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत देशातल्या  एकूण गुंतवणुकीच्या 52 पूर्णांक 46 शतांश टक्के म्हणजेच सुमारे 70 हजार 795 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक्स माध्यमाद्वारे  ही माहिती दिली. इतर आठ राज्यांमधल्या परकीय गुंतवणुकीच्या बेरजेपेक्षा अधिक गुंतवणूक आणण्यात राज्य स...

September 5, 2024 8:30 PM

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३०७ कोटी रुपयांचा निधी द्यायला मान्यता

नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून ३०७ कोटी रुपयांचा निधी वितरीत करायला राज्यशासनानं मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासननिर्णयही आज जारी केला आहे. शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात किंवा अन्य वसुलीसाठी वळती करु नये, याची काळजी घेण्याचा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

September 4, 2024 4:02 PM

विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडेल, असा असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.   विदर्भात काही भागात पावसाची संततधार राहणार असून सातारा आणि पुणे तसंच, पश्चिम महाराष्ट्रातल्या घाटभागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिकसह इतर काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

September 3, 2024 7:23 PM

राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर कायम

राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर कायम असून, नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यात रेणापूर इथं आज दुपारी सुधा नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण वाहून गेले. स्थानिक प्रशासन त्यांचा शोध घेत  आहे.    परभणी जिल्ह्यात आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली. दमदार पावसामुळे जिल्ह्यातल्या  येलदरी, दुधना,  ढालेगाव तारुगव्हाण आणि मासोळी या  धरणांच्या पाणी साठ्यात चांगली भर पडली आहे. धरणातून  पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यामुळे  गोदावरी , पूर्णा, दुधना, करपरा या नद्यांना पूर आ...

September 2, 2024 7:50 PM

राज्यात विविध ठिकाणी झालेल्या पावसात ४ जणांचा मृत्यू, १७ जण जखमी

राज्याच्या विविध भागात पावसानं जोर धरला आहे. मराठवाड्यात हिंगोली, जालना आणि परभणीत काल रात्री जोरदार पाऊस झाला आहे. अतिवृष्टीत ४ लोकांना प्राण गमवावे लागले असून, १७ जण जखमी झाले आहेत. ८८ जनावरं या अतिवृष्टीत दगावली आहेत. १६० कच्च्या घरांची पडझड झाली आहे. मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आढावा घेतला असून, शेतीसह इतरही नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन प्रशासनानं त्वरित मदत करावी, असेही निर्देश दिले आहेत.    नांदेड जिल्ह्यात एसडीआरएफचं ...

September 1, 2024 7:16 PM

राज्यात अनेक भागात पुन्हा पावसाचा जोर

राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. आजही राज्यात अनेक भागात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब्याच्या पट्ट्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे राज्यातल्या हवामानात मोठा बदल झाला असून पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे राज्यात येत्या तीन दिवसांत बहुतांश भागात जोरदार पाऊस होईल. मध्य-महाराष्ट्रातही पावसाची शक्यता असून, घाटमाथ्यावरदेखील पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. साधारणत: ३ सप्टेंबर ते ५ सप्टें...

August 29, 2024 8:16 PM

३ सप्टेंबरला महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातल्या उत्कृष्ट संसदपटू आणि भाषण पुरस्कारांचं वितरण

महाराष्ट्र विधान मंडळातल्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे दिल्या जाणाऱ्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातल्या उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण या पुरस्कारांचं वितरण ३ सप्टेंबर रोजी मुंबईत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. सन २०१९ ते २०२४ या कालावधीसाठी हे पुरस्कार दिले जातील. यावेळी वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व या ग्रंथाचं प्रकाशन देखील करण्यात येईल, अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दि...