September 3, 2024 8:29 PM
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण
महाराष्ट्र विधान परिषदेनं स्थापनेपासून आत्तापर्यंत गेल्या १०३ वर्षांमध्ये इथल्या लोकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काम केलं आणि जबाबदार वरिष्ठ सभागृहाची भूमिका बजावली आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले आहेत. त्या आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. या सभागृहानं वादविवाद आणि संवादाची परंपरा कायम ठेवून लोकशाही मजबूत केली, असं त्या म्हणाल्या. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष कर...