September 23, 2024 8:06 PM
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
राज्याच्या सांस्कृतिक धोरण-२०२४ ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. महाराष्ट्राला एक सशक्त सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख निर्माण करुन देणं, आपल्या समृद्ध वारसा आणि कलेची जपणूक करुन जागतिक पातळीवर राज्याचं सांस्कृतिक महत्व अधोरेखित करणं. या दृष्टीनं हे सांस्कृतिक धोरण तयार केलं आहे. ऐतिहासिक ठिकाणं, कला संग्रहालयं आणि साहित्य यासारख्या सांस्कृतिक संपत्तीचं संरक्षण आणि संवर्धन करणं, सांस्कृतिक धोरण तयार करताना स्थानीय समुदाया...