September 26, 2024 8:17 PM
राष्ट्रीय पोषण महिना उपक्रम राबविण्यात महाराष्ट्र आघाडीवर
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सातव्या राष्ट्रीय पोषण महिना उपक्रमा अंतर्गंत आतापर्यंत ९ कोटी ६८ लाखांहून अधिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. यावर्षी राबवण्यात येत असलेल्या या अभियानात महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेश राज्यांनी चांगली कामगिरी केली असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे. ॲनिमिया प्रतिबंध, पौष्टिक आहार आणि कल्याणकारी अभियानांतर्गत सुमारे एक कोटी ८८ लाख कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. एक कोटी ४५ लाख कार्यक्रमांत पूरक आहार सेवनावर आधा...