September 21, 2024 12:22 PM

सर्व शैक्षणिक संस्थांनी मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहित करावं- राष्ट्रपतींचं आवाहन

सर्व शैक्षणिक संस्था आणि शिक्षकांनी मुलींना उच्च शिक्षण आणि स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. इंदूरमधील देवी अहिल्या विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती काल संबोधित करताना बोलत होत्या. पालक आणि शिक्षकांचा पाठिंबा आणि मार्गदर्शनानं मुली मोठी स्वप्नं पाहू शकतात आणि ती पूर्ण करू शकतात, देशाच्या विकासात ही खरी भागीदारी होऊ शकते असंही मुर्मू म्हणाल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता आणि आवडींच्या आधारे त्यांच्या भविष्यातील कार...

July 15, 2024 2:53 PM

मध्य प्रदेशात प्राईम मिनिस्टर कॉलेज ऑफ एक्सलंसचं अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन

 मध्य प्रदेशातल्या सर्व ५५ जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना उत्कृष्ट आणि उच्च दर्जाचं शिक्षण देण्यासाठी प्राईम मिनिस्टर कॉलेज ऑफ एक्सलंसचं उद्घाटन केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल इंदूर इथं झालं.   मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव यावेळी उपस्थित होते.नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केल्याबद्दल आणि आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबातल्या मुलांना लाभदायक वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम हिंदीमध्ये सुरू केल्याबद्दल शाह यांनी मध्य प्रदेश सरकारचं कौतुक केलं.